शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या शेतजमीन मोजणीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:34 IST

भावड येथील शेतजमिनीची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी केली.

शेतकऱ्याला न्यायाची अपेक्षा : भूमिअभिलेख कार्यालय पवनी येथे अनेकदा हेलपाटेकोंढा (कोसरा) : भावड येथील शेतजमिनीची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी केली. त्यांनी दुसऱ्या मोजणीत गट क्र. ८८५ मध्ये गट क्र. ८८५ च्या मालकाची जागा दाखविल्याने शेतकऱ्यामध्ये भांडणे लावली. सध्या भूमापक पी. जी. गोस्वामी मृत्यू पावले. त्यामुळे अन्याय झालेल्या महिला शेतकरी राजश्री रामकृष्ण हेमणे यांनी वरिष्ठांना अनेकदा तक्रार करुन देखील न्याय मिळाला नसल्याची तक्रार केली आहे.उपअधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय, पवनी हे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोजमाप, पोटहिस्सा मोजणी तसेच इतर कामे करण्यासाठी शासनाचे कार्यालय आहे. पण येथे कुणाचे नियंत्रण नाही. कर्मचारी केव्हाही येतात जातात असे दृष्य पहावयास मिळते. उपअधिक्षक सय्यद यांचेकडे पवनी व्यतिरिक्त लाखांदूर कार्यालयाचा चार्ज असल्याने ते देखील कार्यालयात अत्यल्प दिसतात. शेतकऱ्यांची तक्रार ऐकूण घेणारे कुणी अधिकारी नाही. सहाय्यक शिंदे यांच्यावर सध्या कार्यालय चालू आहे.भावड येथील शेतकरी राजश्री रामकृष्ण हेमणे यांच्यामार्फत त्यांचे पती रामकृष्ण हेमणे अनेकदा या कार्यालयात आपली कैफीयत मांडण्यासाठी गेले. पण त्यांना खाली हाताने निराश होऊन चार, पाचदा परत यावे लागले आहे. त्यांची शेतजमीन भावड येथे आहे. कोंढा बेलाटी रोडलगत त्यांच्या शेजारी असलेले शेतकरी भास्कर मारोती अनकर यांनी त्यांची जमिन भु.क्र. ८८६ हेक्टर आर. ०.६ ची मोजणी १० डिसेंबर २०१३ ला केली. भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी मोजणी केली व हद्द कायम केली. परंतु भास्कर मारोती अनकर रा. भावड यांनी पुन्हा मोजणीचे पैसे भरुन १८ जुलै २०१४ ला दुसऱ्यांचा पी. जी. गोस्वामी यांचेकडून मोजणी केली. या मोजणीमध्ये भूमापकांनी भास्कर मारोती अनकर यांची जमिन गट क्र. ८८६ मध्ये दाखवून शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावली आणि राजश्री रामकृष्ण हेमणे यांच्या जमिनीच्या गटात दाखवून हद्द कायम केली. आम्ही त्याचा विरोध केला तरी भुमापकाने कोणाचेही न ऐकता भास्कर अनकर यांना माझ्या जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्यास सांगितले आणि शेतकऱ्यामध्ये भांडणे लावली.भुमापक पी. जी. गोस्वामी यांनी एकच जमिनीची दोनदा मोजणी करुन वेगवेगळी हद्द कायम केली दुसऱ्या मोजणीच्या वेळी लगतच्या शेतकऱ्याच्या सह्या त्यांनी मोजणी योग्य न वाटल्याने केल्या नाही. तरी हद्द कायम केली. याची तक्रार भूमिअभिलेख भंडारा यांना केली. उपअधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय पवनी यांना ६ जानेवारी २०१५ ला पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्यास सांगितले. कार्यालयास वकिलाकडून नोटीस देखील दिले. पण याचा काही उपयोग झाला नसून त्यांना उपअधिक्षक कार्यालयाकडून कार्यवाही सुरु आहे असे मोगम उत्तर कर्मचारी देत आहेत. मालकीच्या गटात जमीन आहे असे दाखवून भास्कर अनकर यांनी जबरदस्तीने शेतजमीनीचा काही भाग कब्जामध्ये घेतला हे कोणत्या न्यायात बसते असा प्रश्न राजश्री हेमने यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक रामकृष्ण हेमने यांनी केले आहे. सध्या उपअधिक्षक कार्यालयाच्या अनेक हेलपाट्या मारल्या पण कोणीही समाधानकारक उत्तरे दिले नाही.उपअधिक्षक सय्यद हे तर कधीच भेटले नाही. सध्या दोनदा जमिनीची मोजणी भेटले नाही. सध्या दोनदा जमिनीची मोजणी करणारे भुमापक मृत्यू पावले. त्यामुळे या प्रकरणाची दुसऱ्या नि:पक्ष भूमापकाकडे हे प्रकरण देऊन याची योग्य चौकशी करुन मला माझी शेतजमीन परत मिळवून देण्याची मागणी राजश्री हेमणे व त्याचे पती रामकृष्ण हेमणे यांनी केले आहे. यासंबंधात सदर प्रतिनिधीने उपअधीक्षक, सय्यद यांची पवनी येथे जाऊन दोनदा भेट घेण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही. (वार्ताहर)