शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पावसाचा प्रत्येक थेंब अडवावा

By admin | Updated: January 29, 2015 23:02 IST

आभाळातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेवून अडविल्यास जमिनीतील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढुन महाराष्ट्रातील टंचाईसदृश परिस्थितीवर मात करता येईल.

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन साकोली : आभाळातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेवून अडविल्यास जमिनीतील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढुन महाराष्ट्रातील टंचाईसदृश परिस्थितीवर मात करता येईल. आतापर्यंत सर्व विभाग जलसंधारणाची कामे विस्कळीत स्वरूपात राबवीत होती. कामामध्ये समन्वय नसल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हता. परंतु महाराष्ट्र शासनाने ५ डिसेंबर २०१४ रोजी टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे हाती घेऊन वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडवावे, जेणे करून भूगर्भातील पाणीसाठी वाढवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी केले. बरडकीन्ही येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून सभापती नारायण वरठे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती श्रावण बोरकर, पंचायत समिती सदस्य मंदा कापगते, सरपंच जितेंद्र झोडे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.के. सांगळे, खंडविकास अधिकारी व्ही.टी. बोरकर, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी अधिकारी के.एम. बोरकर उपस्थित होते. साकोली तालुक्यातून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी दहा गावांची निवड करण्यात आली असून बरडकिन्ही हे यातील एक गाव या सर्व दहाही गावाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक राधेश्याम खोब्रागडे, जी.बी. साठवणे, अनिल काडगाये, गोपीचंद कानेकर, मंगेश गायकवाड, भोजराज बनकर, रायभान सोनवाने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)