शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: August 3, 2015 00:32 IST

पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत.

नियमांना तिलांजली : शेतकरी सापडला आर्थिक कोंडीतपालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत. सध्याला वरुण राजाच्या कृपेने शेतकरी सुखावला आहे. सर्वत्र धानाचे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना मतासाठी पायपीट करावी लागत आहे. खत विक्रेते ग्राहकांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेत आहेत. बिल देण्यास टाळाटाळ करीत आहेत. बिलाची मागणी केली असता अरेरावी केली जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागात सिंचनाची सोय असल्यामुळे बाराही महिने पिक काढले जाते. मात्र मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कोंढा कोसरा परिसरातून सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळपास दहा खत विक्रेत्यांचे मोठमोठी दुकाने आहेत. प्रशासनाकडून या दुकानदारांना काही नियमावली दिली आहेत. खताच्या पिशवीवर असलेली किमतीतच खत द्यावे, शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे, वाजवीपेक्षा जास्त पैसे घेऊ नये असे अनेक नियमांचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हे खत विक्रेते शासकीय नियम धाब्यावर ठेवून शेतकऱ्यांकडून लुटमार करीत आहेत. एका बॅगवर ३० ते ५० रुपये जास्त प्रमाणात घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी या संदर्भात हटकले असता स्टॉक नाही, पुढे जा असे बोलल्या जात आहे. साधी कच्च्या पावतीवर नाव लिहून बिल देत आहेत. त्या बिलावर दुकानाचे नाव, परवाना क्रमांक शेतकऱ्यांची लुटमार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन, तक्रारी दिल्यात. मात्र कोणतेही अधिकारी भिरकावून पाहत नाही. कोंढा कोसरा येथे अनेक खताचे डिलर आहेत. त्याची मोठमोठी खत, औषधांची दुकाने आहेत. हे दुकानदार शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आाहेत. एकीकडे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडला आहे तर दुसरीकडे अधिकारी खत दुकानदार मालामाल होत आहेत. हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. बाहेरून आलेला खताचा स्टॉक दुकानात न उतरवता कुणाच्या घरी बाहेरील गोदामात उतरविला जातो. दुकानात स्टॉक नाही म्हणून लिहिले जाते. कोंढा येथील दुकानदाराचे पालोरा परिसरात मोठमोठे गोदाम आहेत. येथेच स्टॉक ठेवला जात आहे. हे सर्व बोलके चित्र शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसते. मात्र अधिकाऱ्यांना दिसत नाही. (वार्ताहर)आतापर्यंत आमच्याकडे तक्रार घेवून आलेला नाही आहो. शेतकऱ्यांनी खत दुकानदारांना बळी पडू नये, कोणत्याही खत विक्रेत्यांनी वाजवी भावापेक्षा जास्त पैसे मागितले किंवा पक्के बिल दिले गेले नाही तर कृषी विभागात येवून तक्रार करावी.- आदेश गजभियेतालुका कृषी अधिकारी, पवनी.