२०२१-२२ मध्ये मोहाडी तालुक्यात खरिपातील पिकांचे सर्वसाधारण भात क्षेत्र २८,८६४ हेक्टर आर आहे. तर रोवणी झालेले क्षेत्र २,५७२ हेक्टर आर आहे. यामध्ये आवत्या व भात रोवणी क्षेत्राचा समावेश आहे. बांधावरील तूर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २१६५ हेक्टर आर असून आतापर्यंत १९३० हेक्टर आर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड झालेली आहे. तीळ ८ हेक्टरवर तर सोयाबीन पिकाची लागवड आठ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. ऊस ७०५ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आला असून, तालुक्यातील एकूण खरीप क्षेत्र ३१,८५५ हेक्टर आर आहे. त्यापैकी ४,६०० हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे.
यावर्षी मृग व आद्रा नक्षत्र दमदार बरसला. शेतकऱ्यांनी धान, तूर, तीळ पेरणीचे काम आटोपले. समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचनाची साधने असणाऱ्यांनी रोवणी सुरू केली. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पऱ्ह्यांची आता चांगली वाढ झाली असून, रोवणीस तयार आहेत. मात्र १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. पाच दिवसांपूर्वी एक दिवसासाठी दमदार पाऊस झाला. शासन दरबारी अतिवृष्टी झाल्याची नोंद एक दिवसासाठी का होईना करण्यात आली. परंतु त्यानंतर पाऊस गेला तो अद्यापर्यंत बेपत्ता आहे.
सध्या ऊन, सावल्यांचा खेळ नित्याचा झाला आहे. पाऊस आज येईल, उद्या येईल याची प्रतीक्षाच आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खाली झोळीत आणखी भोके पडण्याची वेळ आली आहे. १०० रुपयांवर पोहोचलेला डिझेल खर्च करून पऱ्हे व रोवणी वाचविण्याची धडपड सुरू झाली आहे.
140721\img_20210706_140133.jpg
कडक उन्ह व बेपत्ता पावसाने शेतकरी सकटात