शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: June 18, 2015 00:35 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची ...

पेरणीला वेग : उच्च प्रतीकडे कलभंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचा कल उच्च प्रतीच्या बियाण्यांकडे असल्याचे कृषी केंद्रावर होत असलेल्या गर्दीवरुन दिसते.धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकरी मशागतीच्या कामाला प्रारंभ करतो. धानाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उच्च प्रतीच्या धानाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येते. उच्च प्रतीच्या बियाणांमध्ये खजाना वाय एस आर, सुपर सोना, केशर, श्री १००८ चा समावेश आहे. त्याची किंमत क्रमश: ५८० रुपये (१० किलो), याचप्रमाणे सुपर सोना ६३० रुपये (१० किलो), केशर ६५० रुपये (१० किलो) आणि श्री १००८ -६३० रुपये (१० किलो) सांगण्यात आली. याचबरोबर अन्य बियाण्यांमध्ये पी के वी (एचएमटी) ७५० रुपये (२५ किलो), सुवर्णा ७३० रुपये (२५ किलो), एम टी यू १०१० -६८० रुपये (२५ किलो), श्रीराम ५०० रुपये (१०किलो), जे जी एम १७९८- ७५० रुपये (२५ किलो), सिडम श्री १०१-४०० रुपये (६ किलो), पद्मा ३६० रुपये (६ किलो), सोना राजा ५८० रुपये (१० किलो), जय श्रीराम ५८० रुपये(१० किलो) आणि अक्षत ६३० रुपये (१० किलो) विक्री करण्यात येत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्यांच्या खरेदीत घट झाली असल्याचे कृषी केंद्र संचालक सांगतात. भंडारा जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासह सोयाबीन ५ हजार क्विंटल मागणीपैकी ७०० क्विंटल सोयाबिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तुर ४५० क्विंटल मागणीपैकी ३०५ क्विंटल उपलब्ध करून देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)१,५८१ कृषी केंद्र शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक बियाणे, कीटकनाशक आणि खते उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात एकूण १५८१ कृषी केंद्र कार्यरत आहेत. यात ४४८ बियाणे केंद्र, ४४८ कीटकनाशक केंद्र आणि ६८५ खतांच्या केंद्रांचा समावेश आहे.