शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजलेले चेहरे गंभीर वातावरण

By admin | Updated: May 16, 2014 23:47 IST

परिवर्तनाची लाट आलेल्या देशात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहर्‍यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला.

भंडारा : परिवर्तनाची लाट आलेल्या देशात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहर्‍यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली मतमोजणी दुपारी ४ वाजतापर्यंत सुरूच होती. आठ तासांच्या मतमोजणीच्या कालावधीत पराभूत उमेदवारांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. कोमेजलेल्या नेत्रबिंदूत धिरगंभीर वातावरण निर्माण होत होते. आता पुढे काय होणार याची शाश्‍वती चेहर्‍यावर स्पष्ट झळकत होती. मतमोजणी सुरू असलेल्या स्ट्राँगरुम परिसरात कुणाला किती मते मिळाली याची चुणुकही लागताच धास्तावलेले चेहरे आकडेवारीच्या आवाजाकडे लक्ष द्यायचे.

प्रत्येक फेरीत हृदयाचे ठोके वाढत असताना मिळत असलेली उमेदवाराला मते बाहेरील वातावरण तापवत होती. सुरुवातीच्या तीन फेर्‍यांनंतर वातावरण धिरगंभीर होऊ लागले. सातव्या फेरीत मात्र चेहर्‍यावरील संयम तुटला. आशेची किरण मावळताना दिसली. दुपारी २ वाजतापर्यंत स्ट्राँगरुम परिसरातील प्रतिनिधी हळूहळू बाहेर निघत होते. विजयी उमेदवाराचा जल्लोष साजरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि साई मंदिर मार्गावर गर्दी जमत होती. घोषणाबाजीमुळे बाहेरील वातावरण विजयाचे तर कोमेजलेल्या चेहर्‍यांना बघून वातावरण तणावाचे होते.

भाजपचे उमेदवार नाना पटोले मोठय़ा मताधिक्याने निवडून आल्याची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विजयाची घोषणा होण्यापुर्वीच विजयी मिरवणुक काढण्यात आली. विजयांच्या घोषणाने आसमंत दणाणून गेले.

दुसरीकडे पराभूत गटातील सदस्यांच्या चेहर्‍यावरचा ताण आणि चिंता स्पष्ट दिसत होती. दुरदर्शनच्या माध्यमातून देशभरात भाजपची लाट दिसत असताना भंडार्‍यातही तशीच स्थिती राहणार काय? या विवंचनेत पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत होते. दुपारनंतर मात्र रस्त्यावर फक्त विजयी उमेदवारांची गर्दी दिसत होती. नारेबाजीत मोदींचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी जिल्हा मुख्य निवडणुक अधिकार्‍यांकडून नाना पटोले यांनी जेव्हा प्रमाणपत्र स्विकारले तेव्हा फक्त अन् फक्त भाजप गटाचेच प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. पराभुताची कारणे शोधण्याची वेळ आता येणार आहेत, असेही चित्र पाहावयास मिळाले. ‘कही खुशीच खुशी तर कुठे फक्त गम’ असाच काहीसा प्रत्यय आज दिवसभराच्या हालचालीनंतर आला.