शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

वैशालीनगरात श्रामणेर शिबिराची सांगता

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

भारतीय बौद्ध महासभा भंडाराच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षण शिबिर वैशालीनगर भंडारा येथे पार पडले. जिल्ह्यातील १४ निवडक धम्मप्रिय उपासकांना श्रामणेरची दीक्षा देण्यात आली.

भंडारा : भारतीय बौद्ध महासभा भंडाराच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षण शिबिर वैशालीनगर भंडारा येथे पार पडले. जिल्ह्यातील १४ निवडक धम्मप्रिय उपासकांना श्रामणेरची दीक्षा देण्यात आली.शिबिरात भदंत महाथेरो दीपंकर व भदंत धम्मरक्षित आणि बौद्धाचार्य आर.आर. कसबे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सांगता व वर्षावास आरंभ यांचा संयुक्त कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष समीक्षक बौद्धप्रिय होते. प्रास्ताविक हर्षल मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाला बौद्धाचार्य आर.आर. कसबे, सी.झेड. गजभिये, वामनराव मेश्राम, एम.डब्ल्यू. दहिवले उपस्थित होते. श्रामणेर दीक्षा प्राप्त झालेले डॉ. महेंद्र रंगारी, प्राणहंस मेश्राम, चंद्रभान मेश्राम, धर्मदास गणवीर, आनंद जांभुळकर, राव लोणारे, दीपक पांडुरंग बेलेकर यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा शाखा भंडारातर्फे आयोजित करण्यात आला होता. बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय महाउपासिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नुषा मीरा आंबेडकर असून जिल्ह्यामध्ये २७ शाखा कार्यरत आहेत. भंते महाथेरो दिपंकर यांच्या हस्ते धम्मदीक्षेचा कार्यक्रम पार पडला. त्यात ४७३ व्यक्तींनी दीक्षा घेतली. त्याची नोंद भारतीय बौद्ध महासभेच्या रजिस्टरमध्ये घेण्यात आली. प्रत्येक नवदीक्षित बौद्धाला १४ आॅगस्टपर्यंत भारतीय बौद्ध महासभेतर्फे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता वर्षावासाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. उपासक, उपासिकांनी समस्त उपस्थितांना खीर वाटप केले.कार्यक्रमासाठी आयोजन जिल्हाध्यक्ष समीक्षक बौद्धप्रिय तसेच समितीचे इतर सदस्यगण प्राणहंस मेश्राम, सुरेंद्र बंसोड, हर्षल मेश्राम, रुपलता फुले, हरकर उके, सुरेश रंगारी, डॉ. महेंद्र रंगारी, वीणा रामटेके, सचिन फुले, हरिचंद्र लाडे, रंजित कोल्हटकर, डॉ. मधुकर टेंभुर्णे, ममता हुमणे, सुमन कानेकर यांनी परिश्रम घेतले. संचालन प्रा.सुरेंद्र बन्सोड तर आभार प्रा. कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)