शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयातील ११ अस्थायी पदांना मुदतवाढ

By admin | Updated: April 21, 2017 00:34 IST

वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवेसाठी निकड लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने

देवानंद नंदेश्वर  भंडारावैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवेसाठी निकड लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातील एकूण ११ अस्थायी पदांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सदर अस्थायी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुन्हा आरोग्य सेवेत रुजू होणार आहेत. परिणामी कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील भार कमी होऊन आरोग्य यंत्रणा काही प्रमाणात बळकट होणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ एप्रिल २०१७ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर मंडळ, नागपूर यांच्या अधिपत्याखाली भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर दोन उपजिल्हा रुग्णालय येतात. या रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे. मात्र त्यांची संख्या कमी आहे. कायमस्वरूपी असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या रुग्णांचा भार कमी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने या दोनही रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरली.या अस्थायी पदांना १ आॅक्टोंबर २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर करार संपुष्टात आल्याने दोनही उपजिल्हा रुग्णालयात अस्थायी डॉक्टर व कर्मचारी सेवेतून भारमुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी नोकरी सोडल्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. सचिन बाळबुध्दे यांच्या खांद्यावर रुग्णालयाचा भार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थीरोगतज्ज्ञ व प्रसूती रोगतज्ज्ञ हे तुमसर येथे आठवड्यातून दोनदा येत असतात. तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले होते.त्यांनी आश्वासनाची पुर्तता केली. जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडविण्यात याव्यात.-चरण वाघमारे, आमदार, तुमसर मोहाडी