भंडारा: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने तहसीलदार सुशांत बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु, जिल्ह्यातील शेतकरी हा दुष्काळग्रस्त असून त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे. यातच शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत असून शिक्षणावर होणारा खर्च त्यांच्याकडे नाही. पैशाअभावी शिक्षणात खंड पडला तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाते. शेतकरी नापिकी व दुष्काळामुळे हताश झाले असून पाल्यांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची मुले शाळा, महाविद्यालय अभियांत्रिकी विद्यालयामधून शिक्षण घेत असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांना योग्य व प्रभावी शिक्षण व उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करावी , अशी मागणी करण्यात आली.निवेदन देताना भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, विदर्भ संघटक अँड.निलेश लोंडे, पं. स. उपसभापती ललीत बोंद्रे, पवन फुलसुंगे, विपनी बागडे, रोशन कळंबे, राहुल बोंदरे, राहुल बाभरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफकरा
By admin | Updated: November 24, 2015 00:43 IST