घरडे यांचे प्रतिपादन : बुद्ध जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमभंडारा : तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी माणसाला माणसासाठी माणसासारखे जगायला शिकविले. बौद्ध धम्म हा मेणबत्त्या, अगरबत्त्या, हाराफुलाचा धर्म नाहीच. बुद्धाची शिकवण म्हणजे मानव जातीच्या कल्याणासाठी विहित केलेली एक आदर्शवत जीवनपद्धती आहे. भ्रष्टाचार हे शिष्टाचार झालेल्या जगात ती अव्यवहार्य वाटत असली तरीही ती अनुकरणीय आहे. सर्व समस्यावर बुद्धीजम हाच नेमका उपाय आहे. माणुसकीशी नाते सांगणारा प्रत्येकजण बौद्ध आहे. भारतीय संविधान त्याची साक्ष आहे, असे प्रतिपादन बसपा जिल्हाध्यक्ष इंजि. त्र्यंबकराव घरडे यांनी केले. बहुजन समाज पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारला त्रिमूर्ती चौक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजेगाव येथील सरपंच सविता शेंडे, जिल्हा सचिव मुकुंद चहांदे, जिल्हा सचिव कुंजन शेंडे, कोषाध्यक्ष नरेंद्र रामटेके, विधानसभा महासचिव संजीव बांभोरे, विधानसभा महासचिव यु.एस. मेश्राम, प्रा.एच.के. पाटील, झिबल उके, राहुल घरडे, सौरभ उके, प्रशांत शेंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. तत्पुर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा सचिव कुंजन शेंडे यांनी केले. संचालन कोषाध्यक्ष नरेंद्र रामटेके, तर आभार प्रदर्शन विधानसभा महासचिव संजीव बांभोरे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
माणुसकीशी नाते सांगणारा प्रत्येकजण बौद्ध
By admin | Updated: May 22, 2016 00:24 IST