शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आसगावचे सरपंच पायउतार

By admin | Updated: October 27, 2016 00:24 IST

पवनी तालुक्यातील आसगाव येथील सरपंच राजेश भेंडारकर हे पदावरून पायउतार झाले आहेत.

आयुक्तांचा निर्णय : ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्तीआसगाव : पवनी तालुक्यातील आसगाव येथील सरपंच राजेश भेंडारकर हे पदावरून पायउतार झाले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लावणे व ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत चालावे नियुक्ती करण्याबाबत आदेश विभागीय आयुक्तांनी २४ आॅक्टोबरला पारीत केले आहेत. माहितीनुसार, ३० मे २०१६ रोजी सरपंच राजेश भेंडारकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव ठेवण्यात आला होता. मात्र त्या दिवशी ग्रामपंचायतीचा एकही सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे अविश्वास ठराव पारीत झाला नाही. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ११ पैकी ७ सदस्यांनी स्वइच्छेने ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला. परिणामी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलमानुसार ग्रामपंचायत आसगाव विघटनाचा प्रस्ताव तसेच प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधिचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केला होता. त्यानुसार उर्वरीत ४ ग्रामपंचायत सदस्य यांची १७ आॅक्टोबर २०१६ ला मते जाणून घेण्यात आली. तसेच २४ आॅक्टोबरला ग्रामपंचायतीचे विघटन न करता नवीन रिक्त जागेत निवडणूक होईपर्यंत पवनी पंचायत समितीचे ज्येष्ठ विस्तार अधिकारी (पंचायत) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (वार्ताहर)विभागीय आयुक्तांनी पंचायत राज अधिनियमानुसार उत्तम कार्य केले आहे. सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायत आसगावचे प्रशासन अल्प मतात आले होते. खऱ्या अर्थाने तेव्हाच प्रशासकाची नियुक्ती व्हायला हवी होती. दरम्यान सदर निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. - मंगेश पाटील ब्राम्हणकरपंचायत समिती सदस्य, आसगाव.