शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिरसी विमानतळ प्रकल्पातून डीजीआर झाला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST

गोंदिया : डीजीआर (सैनिक पुनर्वसन) रद्द करून कामावर घेण्याच्या मागणीसाठी मागील २ महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या बिरसीवासीयांच्या आंदोलनाचे ...

गोंदिया : डीजीआर (सैनिक पुनर्वसन) रद्द करून कामावर घेण्याच्या मागणीसाठी मागील २ महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या बिरसीवासीयांच्या आंदोलनाचे फलित मिळाले आहे. बिरसी विमानतळ प्रकल्पातून आता डीजीआर पूर्णपणे रद्द करण्यात आल्यामुळे स्थानिकांना सुरक्षारक्षक म्हणून कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील १३ वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या स्थानिक सुरक्षारक्षकांना डीजीआरचा अवलंब करत विमानतळ प्रशासनाने कामावरून पूर्णतः बंद केले होते. आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे यासाठी सुरक्षारक्षकांनी मागील २ महिन्यांपासून विमानतळाच्या गेटसमोर आपल्या कुटुंबासह आंदोलनाला सुरुवात केली होती.

आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्यांनी स्थानिक संघटनांपासून तर आमदार, खासदार तसेच केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केला होता. तसेच महामहिम राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली होती. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने हा प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. अन्यायग्रस्त सुरक्षारक्षकांना न्याय मिळावा म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, आमदार विनोद अग्रवाल यांनी हा प्रश्न दिल्ली दरबारी उचलून धरला होता. अखेर या विमानतळ प्रकल्पातून डीजीआर कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सध्या सुरू असलेला डीजीआर प्रायोजित सुरक्षा कंत्राट सुद्धा रद्द करण्यात आले अशी माहिती रिसेटलमेंट विभागाकडून देण्यात आली आहे. स्थानिक सुरक्षारक्षकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी डीजीआरची मोठी अडचण होती. विमानतळ प्रशासनाद्वारे सुद्धा याच डीजीआरचा उपयोग करीत स्थानिक नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत होता. आता या विमानतळ प्रकल्पातून डीजीआर रद्द झाल्यामुळे कामावरून कमी करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना कामावर परत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता विमानतळ प्रशासन किती दिवसात या कामगारांना पुन्हा कामावर रूजू करुन घेते याकडे लक्ष लागले आहे.

डीजीआर रद्द करावा ही आमच्यासाठी व प्रकल्पबाधित गावांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासाठी आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील सर्व संघटना व जिल्हा प्रशासनाचे आभार. मात्र जोपर्यंत आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात येत नाही तोपर्यंत आमची ही लढाई सुरूच राहणार.

-पंकज वंजारी,

महासचिव, विशाल सुरक्षा कंत्राटी मजदूर संघटना.