शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अखेर वनविकास महामंडळाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:02 IST

गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती.

ठळक मुद्देदणका लोकमतचा : आता जिल्ह्यात होणार मिश्र रोपवन

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती. म्हणजे कापणी शंभर प्रकारची आणि वृक्ष लावायचे झाल्यास मोजक्या जातीचे असा प्रकार जिल्ह्यात या आधी ठिकठिकाणी हजारो हेक्टरमध्ये पहायला मिळेल. परंतु आता मात्र या मिश्र रोपवनाची लागवड व्हावी आणि करावी म्हणून तिर्री ग्रामवासीयांनी चक्क वनविकास महामंडळाचे लाकूड भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य असल्याचे पत्रही ग्रामपंचायतला पाठविले. परंतु हा प्रश्न केवथ तिर्री गावातील जंगलाचा नसून संपूर्ण जिल्ह्यातील जंगलाचा असल्याचे मत माजी सरपंच नरेंद्र आयतुलवार यांनी मांडले होते.विभागीय व्यवस्थापक वनप्रकल्प विभाग, भंडारा डी.एस. इंगळे यांना मित्र रोपवनाविषयी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वनविकास महामंडळ वृक्षतोड करत आहे त्या त्या ठिकाणी आता जिल्हाभरात मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी प्रश्न असा पडतो की हे शहाणपण जे तिर्री ग्रामवासीयांनी वनविकास महामंडळाच्या लक्षात आणून दिले ते यांना आधीच का आले नाही? की लक्षात येवून सुद्धा जसा तसाच चालवायचा असा तर कदाचित होत नसावा हाही एक प्रश्नच आहे.काय आहे सागवन आणि बांबू वृक्ष लावण्यामागचे कारण. तर एका प्राप्त माहितीनुसार सागवन वृक्ष जडी तसेच बांबूचे रोप एकदा लावले की हिशोबच संपतो आणि यामुळे मात्र सर्वात जास्त त्रास जर होत असेल तर जंगलात राहणाºया वन्यप्राण्यांना. या दोन्ही वृक्षामुळे जंगलातील वन्यप्राणी जसे माकड, अस्वल, हरिण, बिबट इत्यादी वन्यप्राण्यांची घरटी मात्र उजाडली हेही तेवढेच सत्य.शासन ग्लोबल वार्र्मिंगचा दाखला देतो. दरवर्षाला वृक्ष लागवड योजना राबवितो. त्यावर लाखो रुपये संवर्धनासाठी खर्च करते आणि पुन्हा दुसरीकडे तयार ताजे टवटवीत निसर्गरम्य शेकडो प्रकारची वनसंपदा मात्र याचा त्याचा दाखला देऊन जप्त करायला तयार होते. करपलेली जंगले पुन्हा होणार का? आणि तशाप्रकारची तरी होणार का? महत्वाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उभी जंगले तोडण्यामागचे कारण तरी काय असू शकते. यामुळे कुणाला फायदा होतो हे माहित नसले तरी यामुळे नुकसान मात्र कुठल्याही एका समाज अथवा व्यक्तीचे होत नसून सर्वांचेच होत आहे. वन्यप्राणी, पशूपक्षी, जीवजंतू आणि मानव या सर्वांचेच नुकसान जर एकामुळे होत आहे याचेही कुणाला देणे घेणे असावे की नसावे, असा सवाल उपस्थित होत आहे.तिर्री ग्रामवासीयांची गावाशेजारील जंगलात रोज भटकंती असते. मोठमोठ्या शहराची जशी परिस्थिती गंभीर झाली तशी गंभीर परिस्थिती आम्ही तरी होऊ देणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गाव आमचा आणि जंगलही आमचाच असे हृदयस्पर्शी शब्द ऐकून आलेली अधिकारीही काही क्षणासाठी गहीवरले होते.