शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प भरले तरीही सिंचनासाठी पाणी नाही

By admin | Updated: August 4, 2016 00:32 IST

तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.

सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा : १६ तासांच्या भारनियमनाने शेतकरी हवालदिलसंजय साठवणे साकोली तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे तिन्ही प्रकल्प तुडूंब भरले असले तरी या पाण्याचा सिंचनासाठी काही एक उपयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे शेतकरी १६ तासाच्या भारनियमनामुळे त्रस्त आहेत. आता शेतकऱ्यांनी जगाव तरी कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.साकोली तालुक्यात तीन मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात चुलबंद नदीवरील निम्न चुलबंद प्रकल्प, दुसरा वडेगाव येथील भीमलकसा प्रकल्प व तिसरा घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प यातील निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम मागील वीस वर्षापासून सुरु असून आतापर्यंत या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून या प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. मात्र ज्या कालव्याच्या माध्यमातून या प्रकल्पाचे पाणी तलावात जावू शेतात जाणार आहे. ते कालवेच अपूर्ण आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आलेले संपूर्ण पाणी वाया गेले ही या प्रकल्पाची शोकांतिका आहे.साकोलीपासून अवघ्या पंधरा किलोेमिटर अंतरावर असलेल्या भिमलकसा प्रकल्प हा वनराईने नटलेला असून या प्रकल्पाच्या चारही बाजूने पहाड्या आहेत. या प्रकल्पात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. मात्र शासनाच्या अपूर्ण कामामुळे या प्रकल्पाची पाळ दोन तीन वर्षातून एकदा तरी फुटून संपूर्ण परिसरातील पाणी शेतात घुसून धानपिकाची नासाडी करते. मग गावकरीच लोकवर्गणी करून त्याची डागडुजी करतात. यावर्षी हाही तलाव तुडूंब भरला असून जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याही प्रकल्पाच्या कालवे तयार नसल्याने हे पाणी सिंचनासाठी उपयोगातच आणता येत नाही. ही सुद्धा एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. तिसरा भुरेजंगी प्रकल्प निसर्गाच्या सानिध्यात असून हाही प्रकल्प भरला आहे. मात्र या प्रकल्पाचे काम अपूर्ण असल्यामुळे हे याही प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यासमोर सिंचनासाठी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.भारनियमनाने शेतकरी त्रस्ततालुक्यातील सिंचनाची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेवून किंवा जसे जमेल तशी जुळवाजुळव करून विहिरी व बोअरवेल केल्या. मात्र यावर्षी ऐन पावसाळ्यात १६ तासाचे भारनियमन सुरु असल्यामुळे या विहिरी व बोअरवेलचाही सिंचनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षनिवडणुकीच्या वेळी मतांचे जोगवे मागणाऱ्या लोकप्रतिनिधी आता शेतकऱ्यांचे हाल दिसत नाही का? न भुतो न भविष्यती असे पावसाळ्यात भारनियमन यावर्षी सुरु झाले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी जरी दुर्लक्ष केले तरी लोकप्रतिनिधी तरी दुर्लक्ष करू नये अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.