शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांची वीज कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्याचा डाव साधला जात आहे. यामुळे वीज अभियंत्यांवर नोकरी जाण्याची पाळी आली असून, त्यांच्यात चांगलाच रोष व्याप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन बुधवारी (दि. २५) मुंबई येथे संघटनेचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत झालेल्या बैठकीत काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, वीज वितरणच्या अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) येथील वीज कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सायंकाळी ६ वाजता गेट मीटिंग घेऊन आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर, आता वीज अभियंत्यांचे ६ सप्टेंबरपासूनचे आंदोलन कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्याचा डाव साधला जात आहे. यामुळे वीज अभियंत्यांवर नोकरी जाण्याची पाळी आली असून, त्यांच्यात चांगलाच रोष व्याप्त आहे. दरम्यान, वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत बुधवारी (दि.२५) मुंबई येथे बैठक झाली. मात्र, बैठकीत संचालकांनी कोणत्याही प्रकारचे ठोस व लेखी स्वरूपात उत्तर दिले नाही. यामुळे ही चर्चा फिस्टकल्याने वीज अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) कार्यालयाच्या प्रवेशद्वारात घेतलेल्या गेट मीटिंगमध्ये कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने करून रोष व्यक्त केला. याप्रसंगी असोसिएशनचे सचिव खुशाल सोनी, प्रविभागीय सचिव प्रदीप मोहीतकर, आनंद जैन, अजित जीचकर, रितेश टांगले, विनोद मस्करे, विलास कोडेकर, प्रदीप राऊत उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण