शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन

By admin | Updated: November 4, 2016 00:53 IST

अनेक वर्षापासून अड्याळ येथील वॉर्ड क्र. ३ मधील बंडू खोब्रागडे यांनी राहत्या घरी भंगार व्यवसाय सुरु केला होता.

लोकमत वृत्ताची दखल :अड्याळ येथील वॉर्ड क्रमांक तीनचे प्रकरण विशाल रणदिवे  अड्याळअनेक वर्षापासून अड्याळ येथील वॉर्ड क्र. ३ मधील बंडू खोब्रागडे यांनी राहत्या घरी भंगार व्यवसाय सुरु केला होता. एवढा वाढला की, त्या ठेवलेल्या भंगार वस्तुमुळे तिथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना त्याचा त्रास होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून अन्यायाला वाचा फोडली होती. याची दखल घेत पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.त्यातच तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना सुध्दा त्याचा त्रास रोजच होत होता. ह्या समस्येविषयी भंगार व्यवसायीकाला ग्रामस्थांनी शेजाऱ्यांनी अनेकदा विंनती केली असतानाही व्यवसाय चालकांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. नंतरचा एक उपाय म्हणून वॉर्डातील काही ग्रामस्थांनी याविषयीची लेखी तक्रार ग्रामपंचायतला दिली. सर्वानुमते रस्त्यावरील घराजवळील ठेवलेला भंगार सामान लवकर उचलण्याचे आदेश ग्रामपंचायतीने या आधी व्यवसायीकाला अनेकदा दिले असतनाही भंगार सामान रस्त्यावरच बळजबरीने ठेवल्यासारखाच होता यात काही शंका नाही. पंरतु जेव्हा ग्रामपंचायत आपल्या नियमावर आली तर आपला भंगार सामान कधीही उचलू शकते याची कल्पना सुध्दा त्या भंगार व्यवसायीकाला कदाचीत नसावी असेच वाटते. ग्रामपंचायत एवढी कठोर नियमावर बोट ठेवून हा भंगार सामान हटविणार म्हणून ग्रामस्थांनाही विश्वास वाटत नव्हता. हा भंगार सामान हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने एक बुलडोजर, २ ट्रक्टर व पाचसहा पोलिस कर्मचारी व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी, व्यवासायीक घरी नसतांना सुध्दा तेथील अतिक्रमण शांततेत काढण्यात आले.या आधी दोन तीनदा चारदा याविषयी पत्रव्यवहार केला परंतू त्याचा काहीही परिणाम व्यावसायीकावर झाला नाही. अतिक्रमण काढण्याआधी रस्ता पाच सहा फुट होता. काढल्यानंरत ११ ते १२ फुट झाला रस्ता मोकळा झाला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे आभार मानले.ग्रामपंचायतीने जप्त केलेला भंगार सामान ३ नोव्हेंबर रोजी पर्यंत जर व्यवसायीकाने १४,५०० रुपये भरले नाही तर विक्री होणार होता. आता पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही की होणार हाही एक प्रश्नच आहे. परंतु व्यवसाय चालक हजर नसताना हा अतिक्रमण काढला तो कायदेशीर आहे की गैरकायदेशीर आहे याचीही चर्चा सध्या गावात रंगत आहे. जर का गैरकायदेशीर असेल तर ग्रामपंचायत काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.