शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एका संघर्षाची अखेर...

By admin | Updated: January 21, 2017 00:27 IST

देशात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील कर्ता पुरूष भय्यालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागपूर येथील रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

भंडारा : देशात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील कर्ता पुरूष भय्यालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागपूर येथील रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव आज शनिवारला भंडारा येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी समाजात शोककळा पसरली आहे. मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या छोट्याशा गावात भय्यालाल भोतमांगे त्यांची पत्नी सुरेखा, मुलगा रोशन व सुधीर आणि मुलगी प्रियंका असा पाच जणांचा परिवार होता. २९ सप्टेंबर २००६ च्या रात्री खैरलांजी येथील त्यांच्या घरावर गावातील काही लोकांनी हल्ला करून भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), सुधीर (२२), रोशन (१८), प्रियंका (१८) यांची हत्या केली होती. या घटनेतून भय्यालाल हे एकमेव बचावले होते. या हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.याप्रकरणाचा खटला भंडारा जलदगती न्यायालयात सुरू होता. जलदगती न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी २४ सप्टेंबर २००८ रोजी या प्रकरणातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा तर दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (नगर प्रतिनिधी)भंडारा जलदगती न्यायालयाने या प्रकरणातील आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देण्यात आले. नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे न्याय न मिळताच भोतमांगे यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. - अमृत बन्सोड, आंबेडकरी विचारवंतभय्यालाल भोतमांगे हे मनमिळावू स्वभावाचे होते. खैरलांजी हत्याकांडानंतर ते एकाकी पडल्याने ते नेहमी चिंतेत राहायचे. दलित, शोषित समाज त्यांच्या पाठिशी होता. न्यायासाठी त्यांची धडपड सुरु होती. मात्र न्याय मिळण्यापुर्वीच त्यांचे निधन झाल्याने समाजबांधवांना हादरा बसला आहे. - डी.एफ. कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल.माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी घटनेनंतर देशातील समाजबांधव भय्यालाल यांच्या पाठिशी होता. २००६ पासून न्याय मिळविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. भय्यालाल यांच्या निधनामुळे समाज पोरका झाला असून दलित समाजाला न्याय देण्यासाठी लढा देत राहू.- आसित बागडे, कार्याध्यक्ष रिपाई (आ) भंडारा.