शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना रिक्तपदांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:21 IST

शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कामगारांचे नोंदणी अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम स्वरूपाचे काम करणाऱ्या मजुरांना नोंदणी सहायक कामगार आयुक्तालया मार्फत बांधकाम कामगारांनी नोंदणी केली जात आहे.

ठळक मुद्दे४५ हजार कामगारांची नोंदणी : किट वाटपातील भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कामगारांचे नोंदणी अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम स्वरूपाचे काम करणाऱ्या मजुरांना नोंदणी सहायक कामगार आयुक्तालया मार्फत बांधकाम कामगारांनी नोंदणी केली जात आहे. आज अखेरपर्यंत जिल्ह्यात ४५ हजार कामगारांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती आहे.शहरी भागासह ग्रामीण भागात सुलभतेने कामगारांना नोंदणी करता यावी यासाठी अनेकदा शिवसेनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली. सध्या खरीप हंगाम असल्याने ग्रामीण भागातून येणाºया बांधकाम कामगारांना तासंतास रांगेत उभे राहून कामाचा खोळंबा होत होता. याचीच दखल घेत माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर कामगार अधिकाऱ्यांनी याची आंदोलनाची दखल घेत कामगारांची नोंदणी तालुकास्तरावर सुरू केली आहे. परंतु अद्यापही काही तालुक्यांमध्ये तालुकास्तरावर नोंदणीसाठी अधिकारी उदासीन असल्याने दिसून येते.त्यामुळे रिक्त कर्मचाऱ्यांच्या पदांमुळे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिवसें दिवस वाढतो आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत आतापर्यंत मोठया प्रमाणात कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु काही कामगारांच्या तक्रारीची दखल घेत कामगारांनी कोणत्याही एजंटांना बळी पडू नये, असेही शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.एकाच अधिकाऱ्यांकडे सहा जिल्ह्यांचा पदभारसहायक कामगार आयुक्त कार्यालयात कामगार अधिकारी सुविधाकार, क्लॉर्क यांची पदे रिक्त असल्याने रिक्त पदांदा अतिरिक्त कारभार इतर कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. सहायक कामगार आयुक्तांकडे देखील सहा पदभार सोपविण्यात आले असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांना पूर्णवेळ देता येत नसल्याने इतर कर्मचारीही कामगारांना योग्य मार्गदर्शन करत नाहीत.