पोटासाठी : शाळकरी मुलांचाही सहभागभंडारा : सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. या कार्यक्र मात अन्नाचे वाढणं करण्याचे आॅर्डर दिल्या जात असतात. असे वाढणं करण्यासाठी युवक मंडळींची आवश्यकता असते. त्यामुळे कॅटरर्सच्या माध्यमातून अशाप्रकारे वाढणं करीत असलेल्या युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. दहावी बारावीची परीक्षा आटोपली आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामीण भागातील युवक या व्यवसायात सामील झाले आहे. गावागावात बुफे व पंगत वाढण्याचे आॅर्डर घेतल्या जाईल, असे फलक लागले आहे. उन्हाळ््यात काय करावे असा प्रश्न अनेक युवकांना पडतो. त्यामुळे कष्टाची सवय असलेल्या व कामाची लाज नसलेल्या युवकांसाठी हा व्यवसाय रोजगाराचे नवे साधन ठरत आहे. या युवकांचा प्रमुख किंवा कॅटर्स उद्योजक असे आॅर्डर घेतात. यात १० ते १५ मुलांची गरज असते. प्रत्येकाला १२० ते १५० रूपये रोज दिले जाते. तसेच एखाद्याला कार्यक्रमात पंगत वाढायची असते. अशावेळी जास्त पैसे आकारले जातात. घरी राहून वेळ व्यर्थ घालण्यापेक्षा काही तरी काम करून मोबादला मिळतो याचा आनंद असल्याचे मत युवक व्यक्त करीत असतात. यातील काही युवक स्वत: आॅर्डर घेऊन शहरातही वाढणं करण्यासाठी जात असतात. ग्रामीण भागातील १० वी १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी यात मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात काही लहान मुलेही असतात. परंतु मोठी मुले त्यांच्यावर कामाचा ताण न पडू देता त्यांना सांभाळून घेत असल्याचा अनुभव येत असल्याचे कार्यक्रमांमध्ये गेलेले नागरिक सांगतात. यातून उन्हाळ््यातील दिवसात स्वयंरोजगार होत असून आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबीयांना यातून आधार मिळत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून सद्यस्थितीत शेतीमालाला भाव मिळत नसून नैसिर्गक आपत्तीने शेती करणे कठीण झाले आहे. या व्यवसायातून ग्रामीण युवकांच्या हाताला काम मिळत असून काही प्रमाणात होत असलेल्या मिळकतीमुळे कुटुंबातून या कामाकरिता परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)कामे करण्यास मित्रमंडळी अनुत्सूकआधी मित्राच्या घरी लग्न किंवा इतरही कार्यक्र म असल्यास इतर मित्र सर्व कामे करीत असे. परंतु आजघडीला मात्र असे चित्र दिसत नाही. त्यामुळे एक नवा रोजगार उदयास आला आहे. अनेक जण स्वयंपाक स्वत: करून केवळ वाढण्याचे आॅर्डर देतात. त्यामुळे थोडा फायदा होतो व युवकांना रोजगारही मिळतो. फुकटात पंगत वाढण्याचे दिवस संपलेकाही वर्षांपूर्वी गावात कोणताही कार्यक्रम असल्यास मित्र परिवार व नातेवाईक आपुलकीने सहभागी होऊन हातभार लावत असे. तसेच वाढण्याचे कामही करीत असे. पण बदलत्या काळानुसार व कुणालाही वेळ देता येत नसल्याने अलीकडे पूर्ण व हाफ कॅटर्सचा काळ आला आहे. यामुळे कोणतेही काम नातेवाईकांना करावे लागत नाही. पैसा देऊन सर्व कामे उरकविण्याकडे कल वाढला आहे.
कॅटरर्स ठरताहेत युवकांसाठी रोजगार
By admin | Updated: April 5, 2015 00:50 IST