शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

अकरावीत प्रवेश 'नो टेन्शन'

By admin | Updated: June 17, 2015 01:02 IST

यंदा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.७२ टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १८,८२० आणि जिल्ह्यातील कनिष्ठ

प्रशांत देसाई ल्ल भंडारायंदा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.७२ टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १८,८२० आणि जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागा १६,१४० आहे. उत्तीर्ण विद्यार्थी व प्रवेश क्षमता बघता यंदा अकरावी प्रवेशाचे 'नो टेन्शन' असेच म्हणावे लागेल. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहावे लागणार नसल्याची चिन्हे आहेत. यंदा जिल्ह्यातील २८७ शाळांमधून २३ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी १८ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ७९.४९ तर मुलींची टक्केवारी ८५.९४ इतकी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १४४ कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांच्या जागांची संख्या १६ हजार १४० आहे. १८ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्यामुळे जागांच्या उपलब्धतेनुसार २ हजार ६८० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांनी प्रवेशासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्याल तथा वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित महाविद्यालयांना त्यांना असलेल्या मान्यतेपेक्षा अतिरीक्त २० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मान्यता आहे. दहावीनंतर पुढे काय? असा प्रश्न असलेल्या विद्यार्थी व पालकांसमोर अनेक अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ७५.९६ टक्के लागला होता. यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या जिल्ह्यात २१५ तुकड्यांना मान्यता आहे. प्रवेश क्षमतेसंबंधात प्रत्येक महाविद्यालयांना २० ची अधिकची मान्यता दिल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाप्रती पालकांनी 'आॅल इज वेल' म्हणून नि:संकोच रहावे, असे म्हटल्यास वागवे ठरू नये.महाविद्यालय व प्रवेश क्षमताजिल्ह्यात १४४ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यात वरिष्ठ महाविद्यालय ११, माध्यमिक महा. संलग्नित ८७, स्वतंत्र महाविद्यालय १५, जिल्हा परिषद महाविद्यालय २१, नगरपालिका महाविद्यालय ०५ व स्वयंम अर्थसहाहित ०५ महाविद्यालयांचा समावेश आहे. शाखानिहाय क्षमता याप्रमाणे. कला ९,६६०, विज्ञान ५,१६०, वाणिज्य ९८० व संयुक्त महाविद्यालयात ३४० असे १६ हजार १४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे.शहराकडे कलपाल्याला भंडारामध्ये प्रवेश मिळावा. यासाठी बहुतांश पालक आग्रही आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची असली तरी, विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी वशिलेबाजीही सुरू आहे.प्रवेश गुणवत्तेवरप्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्याने मिळविलेले गुण या आधारेच सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेश यादी तयार केली जाते. परिणामी, गुणवत्ता यादी जाहीर केली काय आणि नाही केली काय प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच आहे.यंदा निकालाची टक्केवारी वाढली. पण, उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेशाची चिंता नाही. अनेक पर्याय, शाखा आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. पसंतीच्या महाविद्यालयात पाल्याला प्रवेश मिळाला नाही तर इतर ठिकाणी प्रयत्न करा, मात्र निराश होऊ नका.- के. झेड. शेंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) भंडारा