तुमसर : एका चार चाकी वाहनातून वीज कंपनीच्या तारा नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी वाहनासह चौघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत हे तार एका कबाडी दुकानात नेण्यात येत असल्याची माहिती समोर आल्याने तारांचा प्रकरण संशयास्पद स्थितीत पोहचले आहे. दरम्यान चौघांना न्यायालयाकडून तात्पूरता जामीन मिळाला आहे. गोबरवाही परिसरातील येदरबुची येथे राऊत यांचा घरी वीज तारा ठेवल्या होत्या.शनिवारी या तारा एका चारचाकी वाहनातून सिहो-याकडे नेण्यात येत होत्या. याची माहिती पोलिसांना होताच त्यांनी वाहन रस्त्यात अडवून चौकशी केली. याप्रकरणी संशय बढावल्याने पोलिसांनी वाहनासह सर्वांना ताब्यात घेतले. सायंकाळच्या सुमारास उपकार्यकारी अभियंता नंदलाल गडपायले, वीज कंपनीचे कंत्राटदार धर्मेंद्र निमजे, कबाडी दुकानदार बन्सोड, सहायक अभियंता अमोल बन्सोड पोलिस ठाण्यात पोहचले. सदर वीज तार वीज कंपनीची असून चारचाकी वाहन सोडण्यात यावे यावरुन त्यांनी ठाण्यात वाद घातला. याप्रकरणात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीच्या तारांची चोरी असल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात देण्यात आल्या होता. आणि आता चोरीला जात असलेल्या वीज तारांवर हक्क सांगून प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. त्यावरुन संशयास्पद स्थितीत पोहचलेल्या या वीज तारां प्रकरणाची सखोल चौकशी होने गरजेचे आहे. दरम्यान चौघांना न्यायालयात हजर केले असता. त्यांची तात्पूरत्या जामीनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणाची सखोल माहिती मिळावी यासाठी उपकार्यकारी अभियंता गडपायले यांच्याशी संपर्क केला असता मोबाईल बंद असल्याने संपर्क होवू शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)
वीज तारांचे प्रकरण संशयास्पद
By admin | Updated: September 22, 2014 23:13 IST