शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत संकलित चाचणीत शिक्षण विभाग ‘नापास’

By admin | Updated: December 22, 2015 00:39 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा -१ ऐनवेळी रद्द करण्यात आली.

दिवाळीनंतर होणारी चाचणी रद्द : धोरणात वेळेवर बदलप्रशांत देसाई  भंडाराप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा -१ ऐनवेळी रद्द करण्यात आली. यापूर्वी आॅक्टोबर २०१५ मध्ये ही परीक्षा घेण्याचे ठरले होते. मात्र नियोजन फिस्कटल्याने दिवाळीनंतरचा मुहूर्त ठरविण्यात आला. तथापि हा मुहूर्तसुद्धा कायमचा चुकल्याने राज्य शिक्षण मंडळच या संकलित चाचणीत ‘नापास’ झाल्याचे दिसून येत आहे.ही परीक्षा आता राज्यस्तरावरून घेण्यात येणार नाही, अशी सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी केली आहे. या निर्णयामुळे सहामाही परिक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रस्तावित संकलित मूल्यमापन- १ ही चाचणी दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे कळविण्यात आले असले तरी आता राज्यस्तरावरून ही चाचणी घेण्यात येणार नाही किंवा या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नोत्तर पत्रिका किंवा मास्टर कॉपी पुरविण्यात येणार नाही, असे संचालकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शाळांनी विद्या परिषदेच्या निर्देशामुळे प्रथम भाषा व गणित या विषयाची संकलित मूल्यमापन - १ ही चाचणी घेतली नसेल त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ही चाचणी शाळास्तरावर घ्यावी. आता राज्यस्तरावरून यंदा तीनऐवजी दोन चाचण्या घेण्यात येईल, असे परिषदेने म्हटले आहे. त्याचवेळी संकलित मूल्यमापन - २ ही चाचणी शासन निर्णयानुसार होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम भाषा व गणित या विषयांची पायाभूत चाचणी जुलै २०१५ मध्ये घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले. परंतु पायाभूत चाचणीच्या प्रश्नोत्तर पत्रिका राज्य स्तरावरून पुरविण्याच्या कालावधीत तांत्रिक घोळ झाल्याने पायाभूत चाचणी सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये घेण्यात आली. अनेक ठिकाणी पायाभूत चाचणीत गैरप्रकारही झाले. संकलित मूल्यमापन - २ साठी प्रश्नपत्रिका संच वेळेत बनणे आणि पुरविणे शक्य नसल्याने ही परीक्षाच रद्द करण्याचा मध्यम मार्ग शिक्षण विभागाने निवडल्याचे बोलले जात आहे. अनेक शाळांमधून सराव म्हणून भाषा व गणित विषयांच्या चाचणी परीक्षा घेण्यात आली. स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमांना बाधा पोहोचेल, या उद्देशातून पायाभूत संकलित मूल्यमापन - १ ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. शासनाने घेतलेला संकलित चाचणीचा निर्णय खरोखरचं विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होता कां? हाच आता संशोधनाचा विषय बनलेला आहे.