शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरकरांच्या नशिबी धूळच धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:47 IST

दुर्गा नगर ते गभणे सभागृह पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम वाहतुकीस पर्यायी व्यवस्था न करता घाईगडबडीत सुरु करण्यात आले आले आहे. मात्र ही कामे कासवगतीनेच सुरु आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची डागडूजी होत आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दुर्गा नगर ते गभणे सभागृह पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम वाहतुकीस पर्यायी व्यवस्था न करता घाईगडबडीत सुरु करण्यात आले आले आहे. मात्र ही कामे कासवगतीनेच सुरु आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची डागडूजी होत आहे. पावसाने उघडीप घेतल्याने मात्र सणासुदीतही तुमसरकरांच्या नशिबी धुळच धुळ राहणार आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.अर्थसंकल्पीय बजेटमध्ये समाविष्ट करून दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे सिमेंटीकरणाचे ४४० लक्ष रुपयांचे काम संबंधित कंत्राटदाराने १५ टक्के बिलोमध्ये घेतले. रनिंग बिल काढण्याच्या लगीनघाईत दुहेरी रस्त्याला वाहतुकीस योग्य न बनविता भर पावसाळ्यात एकेरी मार्गाचे खोदकाम करण्यास सुरुवात केली. परिणामी सुरु असलेल्या एकेरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले. त्यात पाणी साचून अनेकदा अपघात घडले. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. दरम्यान 'लोकमत'ने या समस्येकडे लक्ष वेधताच संबंधित कंत्राटदाराने घाईगडबडीत रस्त्याची डागडुजी ओबडधोबड केली. परिणामी रस्त्यात आणखी मोठमोठे खड्डे पडले. त्यात पुन्हा मुरुम टाकले आहेत. पाऊस पडल्यावर हा रस्ता चिखलांनी माखतो. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान पावसाने आता उघडीप घातली आहे.या रस्त्यावर राज्य मार्ग, बसस्थानक, बँका, महाविद्यालय, दवाखाने, मोठमोठे व्यवसायीक असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रस्त्यावरून मोठे व जड वाहने गेल्यास धुळीचा अक्षरश: धुव्वा उडतो. त्यामुळे समोरचे वाहन देखील दिसत नाही. तोंड व नाकावाटे धूळ शरीरात जाते. यामुळे तुमसरकरांना विविध आजारांनी जडले आहे. याशिवाय डोळ्यांच्या त्रासातही वाढ झाली आहे. मात्र काम हे कासवगतीनेच सुरु असल्यामुळे इकडे आड तिकडी विहिर अशी तुमसरकरांची स्थिती आहे.रस्त्याचे काम असेच कासवगतीने सुरु राहिल्यास आणखी तीन महिने तुमसरकरांना धुळीचा त्रास सोसावा लागणार का? संबंधित विभागाने यावर उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.-अनिल बावनकर, माजी आमदार, तुमसर.