शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ६० कोटींची रेती चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:48 IST

जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे. या चोरट्यांना महसूल विभागाची साथ मिळत असल्याने ते कुणालाही जुमानत नाही. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असला तरी कोणतीही कारवाई होत नाही.

ठळक मुद्देकारवाईसाठी टाळाटाळ। नरेश डहारे यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे. या चोरट्यांना महसूल विभागाची साथ मिळत असल्याने ते कुणालाही जुमानत नाही. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असला तरी कोणतीही कारवाई होत नाही. रेती चोरट्यांनी वर्षभरात ६० कोटींची रेती चोरुन नेल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य नरेश डहारे यांनी पत्रपरिषदेत केली.ते म्हणाले, भंडाऱ्यातील रेतीची सर्वात मोठी बाजारपेठ नागपूर आहे. एका दिवसाला सातशे ते आठशे ट्रक रेती ओव्हरलोड भरून नागपूर व अन्य ठिकाणी नेली जाते. हा सर्व प्रकार महसूल विभाग व पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. ट्रक मालकाने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक मालक ५० हजार रुपये एन्ट्रीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना देतात. त्यात आरटीओ, पोलिस, ज्यांच्या हद्दीप्रमाणे महिने बांधलेले आहेत. तहसीलदारांचाही महिना ठरलेला असल्याने कुणीही कारवाई करण्यासाठी धजावत नाही. जिल्हा व तालुका स्तरावर महसूल व पोलिस विभागाचे पथक असले तरी घाटावर धाड मारण्यापूर्वीच या पथकातील अधिकारी रेती चोरांना सतर्क करीत असतात. कारवाई केलीच तर राजकीय पुढारी मध्यस्थी करून कारवाई बंद पाडतात, असाही आरोप नरेश डहारे यांनी केला आहे. जिल्ह्यात २०१९-२० अंतर्गत वर्षामध्ये सुमारे ३५ ते ४० कोटीचे रेती घाट विकलेले आहे. जिल्हा प्रशासनाने रेती विक्री करीत असताना १५५५ रुपये आॅफसेट प्राईजने विक्री काढली. बोलीमध्ये ती त्यापेक्षा महाग गेली. सरकारने एग्रीमेंटमध्ये चारशे रुपये रेट देते. त्यांचे दुष्परीणाम सरकारी कंत्राटदारांवर झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.शासनाचे कोट्यवधींचे नुकसानजिल्ह्यात मे २०१८ पासून आजपर्यंत ५० वर्षात झाले नाही इतका रेतीचे दोन ते तीन किलोमीटरवर उत्खनन झाले आहे. या घाटांना पर्यावरणाची मंजूरीही मिळालेली नाही. तरीसुद्धा वैनगंगा व सूरनदीमधून अतोनात उत्खनन झाल्याने आता रेती शिल्लक राहीली नाही. मोहाडी तालुक्यातील रोहा, ढिवरवाडा, कन्हाळगाव, मुंढरी, निलज, देव्हाडी, सुकळी, पाचगाव, नेरी, बोथली, पांजरा, मोहगाव देवी, भंडारा तालुक्यातील खमारी बुटी, टाकळी पुनर्वसन, कोथूर्णा, लावेश्वर, दाभा, इंदूरखा, पवनी तालुक्यातील कुर्झा, इटगाव, येनोळा, पवनी, जुनोना, वलनी, धानोरी, भोजापूर, गुडेगाव, खातखेडा, तुमसर तालुक्यातील आष्टी, सोंड्याटोला, ब्राम्हणी, माडगी, बोरी पांजरा, तामसवाडी या घाटतून रेतीचे उत्खनन झालेले असून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडालेला आहे.