शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण

By admin | Updated: August 3, 2014 23:10 IST

मुद्देमालासहित व्याजाची रक्कम देत नाही, म्हणून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. तसेच बळजबरीने उचलून नेऊन एका खोलीत चार तास डांबून ठेवून मारहाण करणाऱ्या अवैध सावकारी करणाऱ्यासह

दोघांना अटक : ४ पर्यंत पोलीस कोठडीतुमसर : मुद्देमालासहित व्याजाची रक्कम देत नाही, म्हणून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. तसेच बळजबरीने उचलून नेऊन एका खोलीत चार तास डांबून ठेवून मारहाण करणाऱ्या अवैध सावकारी करणाऱ्यासह त्याच्या मित्राला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे.दोन्ही आरोपींवर ३४२, ३६५, ५०६, ३४, २४, ३९, ४१ (क), ४५ मुंबई सावकारी कलम २०१४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रेमदास उर्फ बंडू मदनलाल राऊत (४५) रा.माता वॉर्ड तुमसर व प्रमोद चक्रधर डहाट (३१) रा.आंबेडकर वॉर्ड, तुमसर असे अटक केलेल्यांची नावे आहेत.शैलेश गिरीधारी बिंझाडे (३०) रा.तुमसर याने अवैध सावकारी करणारा प्रेमदास राऊत याच्याकडून सन २०१३ मध्ये २ लक्ष ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. त्याऐवजीू बिंझाडे यांनी राऊत यांच्याकडे आपल्या घराचे विक्रीपत्र तथा इतर दस्ताऐवज ठेवून एक करारनामा लिहून घेतला होता. प्रेमदास याला आतापर्यंत ५० हजार व्याज बिंझाडे यांनी दिले. उर्वरीत २ लक्ष शिल्लक रकमेकरिता राऊत याने बिंझाडे याला भ्रमणध्वनी केला. परंतु बिंझाडे यांनी तो उचलला नाही. ३० जुलै रोजी शैलेश बिंझाडे सनफ्लॅग कंपनीतून कामावर परत येतांनी तुमसर येथील जैन मंदिर चौकात राऊत व डहाट यांनी थांबवून मारहाण केली. बळजबरीने तहसील कार्यालय परिसरातील कार्यालयात बिंझाडेला आणले. त्यानंतर चार तास डांबून ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. परिसरातील दोन ते तीन नागरिकांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. त्यानंतर बिंझाडे यांची सुटका करण्यात आली. बिंझाडे झालेल्या प्रकारामुळे भयभीत झाले होते. त्यांनी ३१ जुलै रोजी तुमसर पोलीस ठाण्यात प्रेमदास राऊत व प्रमोद डहाट यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. तुमसर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची ४ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तपास एसडीपोओ आनंद भोईटे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर गवई, हवालदार बोरकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)