शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पऱ्हे करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

०७ लोक ०५ के विशाल रणदिवे अडयाळ : अडयाळ व परिसरातील तब्बल ८० लहान-मोठ्या गावांतील शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे ...

०७ लोक ०५ के

विशाल रणदिवे

अडयाळ :

अडयाळ व परिसरातील तब्बल ८० लहान-मोठ्या गावांतील शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे चिंताग्रस्त आहेत. पावसाचा थांगपत्ता नसल्याने पऱ्हे करपत आहेत. आधीच नेरला उपसा सिंचन व निसर्गाची साथ लाभली नाही तर पर्यायाने शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

अडयाळ आणि परिसरात आजही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. दुसरी खेदाची बाब म्हणजे जोपर्यंत शेतकरी पाणीपट्टी भरणार नाहीत तो पावेतो नेरला उपसा सिंचन सुरू होणार नसल्याने येथील शेतकरी डोक्यावर हात ठेवूनच आहे. नेरला उपसा सिंचन सुरू करावे म्हणून अडयाळ येथील पवणी तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष अमोल उराडे यांनी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन दिले आहे. तसेच अडयाळ, चिखली, पिलांद्री, उमरी, केसलवाडा, सालेवाडा इत्यादी गावांतील शेतकरी मोठ्या आतुरतेने नेरला उपसा सिंचन सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत आहेत.

उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १ कार्यालय आंबाडी येथून जी पत्रके वाटप झालीत, त्या मानाने गावागावातच जर पाणीपट्टी जमा करणारा एक अधिकारी वा कर्मचारी दिले असते तर काम सोपे झाले असते. प्रत्येक शेतकरी हा आंबाडी येथील कार्यालयात जाऊन पाणी पट्टी जमा करायला जाणार कसा, असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांना एकूण तीन वर्षांची पाणीपट्टी भरणे आहे. नेरला उपसा सिंचन योजनेची बरीच कामे पूर्ण झालीच नाहीत, तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं?, यावेळी ही चर्चा मात्र अनेक गावात रंगत आहे. आज शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे आणि अशाही परिस्थितीत बोलायचे नाही काल असा प्रतिप्रश्न शेतकरी विचारीत आहेत. येत्या पाच दिवसांत पाणी बरसला नाही आणि नेरला उपसा सिंचनाचे पाणीही जर सोडले गेले नाही तर मग शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही आणि असे होणे म्हणजे पुन्हा आर्थिक संकटात सापडणे, असा आहे.