भंडारा : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी चिखलखारी टाकल्या असून अनेकांच्या शेतात पाण्याचा निचरा किंवा पाणी साठाप्रमाण कमी जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे बिघडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.काही शेतकऱ्यांचे पऱ्हे पावसापूर्वी टाकल्याने चांगल्या प्रकारे बीज अंकुरीत होवून घनदाट हिरवेगार उगवले आहेत. यंदा हवामान विभागाने पावसाबद्दल दिलेला अंदाज शेतकऱ्यांना खचित करणारा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात धान पेरणी केलीच नाही. परंतु, काही शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करीत पावसापूर्वीच मृग नक्षत्रात पेरणी केली. मृग नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. परंतु, पाऊस जास्त आल्याने सर्वत्र शेतात पाण्याचा साठा झाला आणि नाईलाजाने अनेक शेतकऱ्याने चिखल तयार करुन पऱ्हे टाकले. चिखलाचे पऱ्हे कमी जास्त होत मागे पुढे अंकुरीत होतात किंवा टेकळभागात बियाणे जसेच्या तसे राहतात. त्यांना पाण्याची गरज असते. काही बियाणे पाणी साचलेल्या ठिकाणी सडण्याच्या अवस्थेत येतात. त्यांना पुवीर्पासून कोरडे वातावरण हवे असते. अशा परिस्थितीत कुठे साधते तर कुठे बिघडते, अशी अवस्था असल्याने बहुतेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे परिस्थितीवरून दिसते.(शहर प्रतिनिधी)
पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By admin | Updated: July 7, 2015 00:38 IST