कर्मचाऱ्यांचा वाणवा : नवीन वास्तूचे बांधकाम कासवगतीनेभंडारा : ऐककाळी भंडारा जिल्ह्याची शान असलेले शासकीय जिल्हा ग्रंथालय अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. स्पर्धेच्या युगामध्ये सामान्य गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता शासकीय जिल्हा ग्रंथालयाकडे धाव घ्यावी लागते. मात्र गं्रथालयाची सद्यस्थिती वाईट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेत येत नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेरून पदवीधर महासंघाचे कार्यकर्ते व विद्यार्थी नगरसेवक महेंद्र निंबार्ते व पराग भुतांगे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांना भेटून समस्यांचा पाढा वाचला.मागील दीड वर्षापासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्हा ग्रंथालयाची खूप जुनी इमारत असून त्याला विस्तारित करून १९९८ ला नूतन इमारत बांधली होती. त्या इमारतीत कसे बसे २५ ते ३० विद्यार्थीच बसू शकतात. नूतन इमारतीचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. कासवगतीने सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, असेही विद्यार्थ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.सध्याच्या इमारतीमध्ये शौचालयामध्ये अस्वच्छता असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विद्यार्थीनींना गैरसोय होते त्यात बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा बिकट परिस्थितींना सामोरे जावे लागते. पुस्तकांचा साठा असून सुद्धा विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिले जात नाही. पंखे व टूबलाईट मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा इमारतीत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शुद्ध पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना सभासद कार्ड बनवून देण्यात येऊन त्यानुसारच पुस्तकांचे वाटप करण्यात यावे.निवेदन देताना पदवीधर महासंघाचे महेंद्र निंबार्ते, पराग भुतांगे, विशाल अंबादे, राहुल शिंदे, सुधीर पांडे, प्रमोद धुर्वे, तनुजा मारवाडे, अपर्णा बांते, कल्याणी चेटुले, आदिनाथ चाचेरे, सुमित मस्के, प्रवीण ठवकर, शीतल ठोंबरे, अमित साकुरे, सागर मेश्राम, संदीप बोंद्रे, संदीप वंजारी, सचिन साखरे, सुधांशू शहारे, रोशन भुते इत्यादी उपस्थित होते. प्रकरणाची गंभीर दखल घेत समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी दिले. (प्रतिनिधी)
जिल्हा ग्रंथालय समस्यांच्या विळख्यात
By admin | Updated: March 18, 2016 00:33 IST