शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जलस्त्रोत रिकामेच असल्याने दुष्काळसदृश स्थिती

By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची पाळी आली. पावसाचे नक्षत्र हळूहळू निघून जात आहेत. सासरा परिसरात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अल्प आहे.

सासरा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची पाळी आली. पावसाचे नक्षत्र हळूहळू निघून जात आहेत. सासरा परिसरात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अल्प आहे. नुकत्याच आलेल्या पावसाने रोवणे कसेबसे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या लहरीपणावर उपाय नसल्याने येथील शेतकरी वर्ग भविष्यातील समस्यांनी चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे.सासरा व परिसरातील जलसंचय करणाऱ्या तलाव /बोड्या अद्यापही तहानलेल्याच आहे. धान पिकाच्या सुगीच्या काळापर्यंत सिंचन व्यवस्था होईल असे दिसून येत नाही. पावसाच्या अल्प प्रमाणाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. सासरा व परिसर ग्रामीण भाग असल्याने या भागातील बहुतांश नागरिक शेतीवर निर्भर आहेत.गतवर्षी अतिवृष्टी तर यावर्षी अवर्षण अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोवणी झालेल्या धान पिकाला जगविण्यासाठी थोडा फार पाऊस येत आहे. पण वातावरणातील तापमानही धानपिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. पेरणी पासून रोवणीपर्यंत आधीच जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना धानपिकाला जगविण्यासाठी महागड्या औषधी वापरावी लागणार आहे. ज्यांच्यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे त्या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्राणपणाने लढावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणाच्या समस्यांनी शेतकरी व्यथीत झाल्याचे दिसून येत आहे. जगाच्या पोशिंद्याच्या नशीबी केव्हा अच्छे दिन येतील हे न उलगडणारे कोडे आहे. उदरनिर्वाह, मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे वैवाहिक प्रश्न, कर्जाची परतफेड इत्यादी समस्या शेतकऱ्यांची झोप उडवत आहेत.अल्प पर्जन्यवृष्टीने धान पिकाला जगविण्यासाठी फारच जिकिरीचे होणार असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचा उर्वरित कालावधी कमी असल्याने जलसाठे रिकामेच राहण्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)