शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या शासनाच्या उदासीन धोरणांमुळे

By admin | Updated: June 19, 2017 00:28 IST

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, ..

प्रफुल्ल गुडघे पाटील : प्रकरण शेतकरी आत्मदहनाचे, लोकप्रतिनिधींनी घेतली शेंदरे कुटुबीयांची भेट लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, अशा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी लावला. जांभोरा येथील मृतक शेतकरी ताराचंद शेंदरे यांच्या कुटूंबीयांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथील आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, पिक विमा योजनेचा लाभ द्यावा, आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी केली. काँग्रेसतर्फे पिडीत कुटूंबीयाला दहा हजारांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रमोद तितीरमारे, महेंद्र निंबार्ते, प्यारेलाल वाघमारे, मानिकराव ब्राम्हणकर, अमर रगडे आदी उपस्थित होते. यादरम्यान लोकमतच्या वृत्तानंतर राजकिय पक्षांनी याची दखल घेत जांभोरा येथे जावून शेंदरे कुटुंबियांची भेट घेतली. यात माजी आमदार तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय सत्तेकार, सुरेश सज्जा आदींनी समावेश आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या भूषणावह नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. शेंदरे कुटुंबियाची मी स्वत: भेट घेतली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी तहसीलदारांना तशी सूचना दिली आहे. मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविण्यासाठी पोलिसांना सांगितले आहे. विरोधक या प्रकरणाला राजकिय रंग देत आहेत.