शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गुरठा परिसरात दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 24, 2016 01:14 IST

यंदा भरपूर पाऊस येणार. जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर असणार, सरासरी १०० टक्के च्या पुढे पाऊस बरसणार, अंदमान निकोबार, केरळ,

पालांदूर : यंदा भरपूर पाऊस येणार. जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर असणार, सरासरी १०० टक्के च्या पुढे पाऊस बरसणार, अंदमान निकोबार, केरळ, कोकण या ठिकाणी मान्सून अगोदरच आला वैगेरे सारखे वार्ता हवामान खात्याने पुरविल्याने शेतकरी आश्वासीत होत पेरणीकडे वळला. मृगाच्या आरंभाला पेरणी केली अन् पाऊस सुटीवर गेला. एक - दोन सरी बरसल्याने आतील दाणा अंकुरला व सुकला तर वरचा दाणा पाखरांनी पोटभरणी केला. यामुळे मृगातली पेरणी वाया गेली. तेव्हा कृषीविभागाने सर्वे करून दुबार पेरणीचे सल्ले व बियाणे मोफत किंवा अनुदानावर पुरविण्याची मागणी गुरठ्याचे प्रगतशील शेतकरी तथा माजी सरपंच माणिक हुमे यांनी केली आहे. हवामान खाते अंदाज व्यक्त करतात. त्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन केले जाते. मात्र आपले हवामान खाते नेहमीच टिकेला पात्र ठरत आहे. सॅटेलाईट च्या दुनियेत आपण कुठे कमी पडतो, कोणते तांत्रिक साहित्य आपल्याला पुरविण्यात शासन कमी पडतो. याचा दीर्घ अभ्यास होणे काळाची गरज वाटते. पाऊस येणार म्हटले तर उन पडते व उन पडणार म्हटले तर पाऊस पडते. असे बऱ्याचदा अनुभवास पडते. अचूक हवामान अंदाजाकरिता अत्याधुनिक साधनांची गरज हवामान खात् याला मिळणे आवश्यक वाटते.गुरठा परिसरातील १०-१५ गावात पेरणीचे प्रमाण ६० टक्के च्या पुढे गेले आहे. यात आवत्याचे प्रमाण नगण्य असून नर्सरी (पऱ्हे)ची पेरणी अधिक प्रमाणात केली आहे. कृषी केंद्रातूनच बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली आहे. गुरठ्याजवळील कनेरी येथील सिंचीत शेतकऱ्याचे बियाणे पाणी देऊनही अंकुरले नसल्याने पुन्हा एकदा बि पुरवठा करणारी कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे. मागील ३ वर्षाचा दुष्काळ डोक्यावर असताना याही वर्षी निसर्गाची हुलकावणी शिरजोर होत असल्याने शेतकरी खचत आहे. पिककर्ज वाढत आहे. दैनंदिन खर्च महागाईने झेपावणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)