शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चालक वाहक म्हणतात, मुंबईची ड्यूटी नको रे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्ट सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या ...

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्ट सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध विभागातील राज्यातील चालक-वाहकांना मुंबई बेस्ट सेवेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र भंडारा जिल्ह्यातील चालक-वाहकातून मुंबईची ड्यूटी नको रे बाबा असे म्हणत अनेक जण नकार देत आहेत.

सुदैवाने भंडारा विभाग नियंत्रक कार्यालयातील एकाही चालक, वाहकाची गतवर्षी मुंबई येथील बेस्ट बस सेवेसाठी ड्यूटी लागली नव्हती. राज्यातील इतर महामंडळाच्या विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे, नांदेड, लातूर, जालना तसेच विदर्भातील अमरावती, अकोला इतर जिल्ह्यातील अनेक चालक वाहकांची मुंबई बेस्ट सेवेसाठी ड्यूटी लागली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक-वाहकांना मुंबईला पाठविण्याचे आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक चालक-वाहकांनी या बेस्ट बस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात विभागीय कार्यालय, भंडाराला आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र हे आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे.

कोट

मुंबईला कर्तव्यासाठी गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोरोना संसर्गाची लागण होऊ शकते, यामुळे अनेकजण मुंबई ड्यूटी नको रे बाबा असे म्हणू लागले आहेत.

गतवर्षी कोरोना काळात इतर राज्यातील मजुरांना सोडण्याचे कर्तव्य निभावले. सुदैवाने मुंबईला जावे लागले नाही. मात्र आता वय वाढत चालल्याने कोरोना संसर्गाची भीती वाटत आहे. ५० व यापुढील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नये.

चालक.

कोट

इकडे सरकार मुंबईला कर्तव्यासाठी बोलावत आहे. पण दुसरीकडे त्याच चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची जबाबदारी एसटी किंवा शासन घेत नाही. शिवाय कुटुंबीयांना नुकसान भरपाईही मिळत नसल्याने शासनाने चालक वाहकांचा विचार करावा.

वाहक

सुदैवाने जिल्ह्यातील एकाचीही मुंबईला ड्यूटी लागलीच नाही

गतवर्षी लॉकडाऊन नंतर जिल्ह्यातील अनेक चालक, वाहकांनी स्थलांतरित परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावले होते. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यापासून घरी पोहचेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मात्र सुदैवाने जिल्ह्यातील एकाही चालक, वाहकाचा मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी जावेच लागले नसल्याने कर्मचारी निश्चिंत होते. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून विविध विभागातील चालक वाहकांची नावे मागविण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे.