शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

प्रशिक्षितांकडून होणार घरगुती गॅस जोडणीची पाहणी

By admin | Updated: July 14, 2014 23:48 IST

घरगुती गॅस वापरादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी नवनी मोहिम १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ज्या ग्राहकांकडे एचपी व इंण्डेन कंपनीचे गॅस कनेक्शन आहे,

भंडारा : घरगुती गॅस वापरादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी नवनी मोहिम १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ज्या ग्राहकांकडे एचपी व इंण्डेन कंपनीचे गॅस कनेक्शन आहे, अशा गॅसधारकांच्या कनेक्शनचे निरीक्षण कंपनीच्या प्रशिक्षित प्रतिनिधींकडून करण्यात येणार आहे. यामुळे घरगुती गॅस वापरादरम्यान होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याने गॅस धारकांच्या सुरक्षिततेसाठीच गॅस कंपण्यांचा हा पुढाकार म्हणावा लागेल.काही दिवसांपूर्वी पवनी तालुक्यात भुयार या गावात घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता. यामागील कारणाचा शोध घेतला असता गॅस कनेक्शन वापरताना आयएसआय प्रमाणित नसलेल्या उपकरणांचा वापर केला असल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पेरेशन व इंडियन आॅईल कॉर्पाेरेशनद्वारे प्रत्येक घरगुती गॅसधारकांच्या कनेक्शनची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.भंडारा, लाखनी, पवनी, साकोली या तालुक्यात १५ जुलैपासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने कंपनीचे प्रशिक्षित प्रतिनिधी घरोघरी जाऊन अत्यल्प दरात गॅसधारकांना साहित्याची व सुरक्षिततेविषयी माहिती देणार आहे. गॅस वापरताना आयएसआय प्रमाणित उपकरणांचा वापर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याने ज्या ग्राहकांकडे आयएसआय उपकरणे नसतील त्यांना त्वरित उपकरणे बदलवून दिले जाणार आहेत. यासाठी कंपनीची रितसर पावतीही ग्राहकांना देण्यात येणार आहे. आॅईल कंपन्याकडून घरगुती ग्राहकांचा अपघातादरम्यान थर्ड पार्टी विमा कंपनीकडूनच काढण्यात येतो. ज्या ग्राहकाने कंपनीच्या निरीक्षणाना प्रतिसाद दिला नाही, त्या ग्राहकांना या विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक ग्राहकाने कंपनीच्या निरीक्षणाला प्रतिसाद देऊन भविष्यातील अपघात टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)