शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आजाराला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

By admin | Updated: April 19, 2017 00:20 IST

मागील काही दिवसांपासून पोटासंबंधीच्या आजाराने त्रस्त असलेल्या भंडारा शहरातील एका प्रख्यात चर्मविकार तज्ज्ञाने आत्महत्या केली.

भंडारा विद्यानगर येथील घटना : विष मिश्रित केलेले सलाईन घेतलेभंडारा : मागील काही दिवसांपासून पोटासंबंधीच्या आजाराने त्रस्त असलेल्या भंडारा शहरातील एका प्रख्यात चर्मविकार तज्ज्ञाने आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी विद्यानगर कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रितीश अरविंद भोयर (३०) असे मृतक डॉक्टरचे नाव आहे. सोमवारला रात्री भोजन केल्यानंतर त्यांनी राहत्या घरी विष मिश्रित केलेले सलाईन स्वत:ला टोचून घेतले होते. आज मंगळवारला सकाळी प्रितीशचे वडील अरविंद भोयर यांनी त्यांना उठविण्यासाठी आवाज दिला. मात्र आताून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खोलीत जावून बघितले असता डॉ.प्रितीश हे निपचित पडून असल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी वडिलांनी भंडारा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना त्यांच्या खोलीतून सलाईनची रिकामी बॉटल, काही वस्तू व आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. रात्रीला सलाईनमधून विष घेवून डॉ.प्रितीश यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून डॉ.प्रितीश यांना पोटाचा आजार होता. या आजारामुळे होणाऱ्या वेदना त्यांना असह्य होत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वडिलांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. एमबीबीएस, एमडी असे उच्च विद्याविभुषित असलेले डॉ.प्रितीश हे शहरात चर्मविकार तज्ज्ञ म्हणून प्रख्यात होते. मागील दोन वर्षांपासून लायब्ररी चौकात त्यांचे खाजगी रूग्णालय होते. २०१३ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस आॅफ डर्मेटोलॉजी तथा आईएडीव्हीएल कॉन्फरन्स डरमेकल २०१४ चे त्यांनी प्रतिधिनीत्व केले होते. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनानंतर व्हिसेरा उच्चस्तरीय परिक्षणासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी सांगितले. हा अहवाल आल्यानंतर डॉ.प्रितिश यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. (शहर प्रतिनिधी)