शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका

By admin | Updated: January 23, 2015 01:08 IST

राष्ट्रीय सणाच्या दिवशी २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे तसेच इतर महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी नागरिक ...

भंडारा : राष्ट्रीय सणाच्या दिवशी २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे तसेच इतर महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टीक व कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॉस्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर व कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले असतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे हे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले आहे.उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या वापरावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी सुद्धा जनजागृती करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्तक दिनी कुणीही प्लॉस्टीक किंवा कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले आहे.हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्र शासन व इतर यांच्या विरुद्ध २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ४ आॅगष्ट व २९ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या सुनावणीत निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार १ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादक विक्रेते तसेच वितरक यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गोळा केलेले राष्ट्रध्वज स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करावेत. हे करताना उपस्थित सवोनी उभे राहावे व ते पूर्णपणे जळून नष्ट होईपर्यंत ती जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहे. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी अशासकीय संस्था, संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज जमा करून जिल्हाधिकारी किंवा तहसिलदार यांच्याकडे सूपुर्द करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी पालकांनी सुद्धा मुलांच्या हातात राष्ट्रध्वज देतांना मुलांना सूचना देऊन महत्व समजावून सांगावे. (प्रतिनिधी)