शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका

By admin | Updated: November 26, 2014 23:00 IST

देशाच्या संरक्षणासाठी शहिद झालेल्या या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, समाजात आपुलकी, प्रेमाने जगा, आशावादी बना असे आवाहन करुन जिल्ह्यात पालांदूर हे एकमेव गाव आहे

पालांदुरात शहिदांना आदरांजली : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले यांचे आवाहनपालांदूर : देशाच्या संरक्षणासाठी शहिद झालेल्या या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, समाजात आपुलकी, प्रेमाने जगा, आशावादी बना असे आवाहन करुन जिल्ह्यात पालांदूर हे एकमेव गाव आहे की जिथे शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा सोहळा बघितल्यावर ऊर भरून येते. तुम्ही पालांदूरवासीय देशभक्त आहात, असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद पटोले यांनी केले.राज्याची राजधानी मुंबईवरील २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपुत्रांना पालांदूर येथील बाजार चौकात आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल त्रिवेदी, पोलीस उपअधीक्षक (गृह) धरमशी, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते दामाजी खंडाईत, इंद्रिस लध्दानी, सरपंच शुभांगी मदनकर उपस्थित होते.प्रास्ताविकात आयोजक तथा जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत म्हणाले, राजकारणात राहून समाजसेवा घडावी. हुताम्यांचे स्मरण करावे, देश प्रेमाची जाणीव निर्माण व्हावी आणि गावाची आदर्शकडे वाटचाल व्हावी या उदात्त हेतूने शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व हुतात्मांच्या स्मृतींस्थळावर पुष्पगुच्छ पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. पोलीस विभागातर्फे शहिदांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत व भक्तीगीत गाण्यात आले. सुदाम खंडाईत यांनी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा दिल्या.यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक हिरामण खंडाईत, शामराव खंडाईत, शंकरराव झलके, बाळा मोटघरे, आसाराम पंचभाई, भाऊराव भेंडारकर, अर्जून शेंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पालांदूर ग्रामीण रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर, मधुमेह, रक्तदाब तपासणी घेण्यात आली. यावेळी ५४ दात्यांनी रक्त्दान केले. यात महिलांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जोपासली. याकरीता डॉ. पालांदूरकर, डॉ. छगन राखडे, डॉ. स्वप्नील आहारकर, डॉ. परवीन पठाण, विद्या ठाकरे, अर्चना अतकरी, घनश्याम टेंभुर्णे आदींनी सहकार्य केले. गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तथा जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन प्रा. संजय निंबेकर यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी केले.या कार्यक्रमाला वैशाली खंडाईत, तुळशीराम भुसारी, प्रतिभा सेलोकर, पंचायत समिती सदस्य धनंजय घाटबांधे, लिलाधर चेटूले, कृष्णा जांभूळकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय कापसे, हरिदास बडोले, कृष्णा धकाते, नारायण कडूकार, का.ना. निखाडे, ता.प. रणदिवे, गजानन शिवणकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली. (वार्ताहर)