तालुक्यातील मुरमाडी सावरी, मुरमाडी, सोमलवाडा, दैतमांगली, रेंगेपार (कोठा), केसलवाडा (वाघ) या गावातील लोकांची खाते सावरी शाखेत आहे. शाखेचा व्यवहार पूर्वीपेक्षा वाढला आहे. सध्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन आहे. बँकेचा व्यवहार वाढण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. सावरी शाखेचे लाखनी शाखेत विलीनकरण केल्यास लाखनी शाखेवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे जनतेचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सावरी शाखा बंद करू नये व शाखेचा व्यवहार वाढावा यासाठी प्रयत्न करून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आकाश कोरे यांनी केली आहे. सावरी व मुरमाडी येथे दुसरी राष्ट्रीयीकृत व सहकारी बँक नसल्याने अनेकांची शाखा बंद झाल्यास गैरसोय होणार आहे.
सावरी येथील एसबीआय शाखा बंद करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST