शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर देता का डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:35 IST

विशेष म्हणजे, मंजूर असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे कंत्राटी स्वरूपाची आहे. महत्त्वपूर्ण पदे कंत्राटी स्वरूपाची असल्याने आरोग्य विभागाचे कामकाज प्रभावित झाले आहे. या केंद्रांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रिक्त पदांमुळे बीएएमएस डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागतो. एमबीबीएस डॉक्टर राहिल्यास कामाची गती अधिक वाढेल. विविध आजारांवर उपचार करणे सोपे होईल.

ठळक मुद्दे३७ एमबीबीएस डॉक्टरच नाही : बीएएमएस डॉक्टरांवर जबाबदारी

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ६६ एमबीबीएस डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी २९ पदे भरलेली आहेत. उर्वरित ३७ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या अनेक ठिकाणी बीएएमएस डॉक्टरांकडे कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंजूर असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे कंत्राटी स्वरूपाची आहे. महत्त्वपूर्ण पदे कंत्राटी स्वरूपाची असल्याने आरोग्य विभागाचे कामकाज प्रभावित झाले आहे. या केंद्रांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रिक्त पदांमुळे बीएएमएस डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागतो. एमबीबीएस डॉक्टर राहिल्यास कामाची गती अधिक वाढेल. विविध आजारांवर उपचार करणे सोपे होईल. यामुळे ही पदे कायमस्वरूपी भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुकती करण्यात संदर्भात प्रशासनाशी अनेकदा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्यानुसार भरतीसुद्धा केली जाते. मात्र या भरती विषयी उदासिनता दिसून येते.

आरोग्य उपकेंद्र बीएएमएस डॉक्टरांच्या हवाली  जिल्ह्यात १९३ आरोग्य उपकेंद्र आहेत. यासाठी डॉक्टरांची १५२ पदे मंजूर असून १४२ डॉक्टर कार्यरत आहेत. १० डॉक्टर ट्रेनींगवरील आहेत. अशा ठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीएएमएस डॉक्टरांना काम करावे लागत आहे. रिक्त पदांमुळे आरोग्य विभागात बीएएमएस डॉक्टरांवर संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचे दिसून येते.

रिक्त पदे भरण्यास शासनाची उदासिनता जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आहे. नागरिकांचा शासकीय आरोग्य यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. रिक्त पदे भरण्याची जबाबदारी वरिष्ठांची आहे. मात्र रिक्त पदे भरण्यास शासनाची उदासिनता असल्याने अनेक आरोग्य केंद्रावरील रिक्त पदांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपचार सेवा सुरळीत सुरू असली तरी त्याचा ताण येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टर