शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीचा बाजार सजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:47 IST

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत होता. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसले. दिवाळीच्या बाजारात शेवटच्या क्षणी रंगत आल्याचे दिसले.

ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत होता. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसले. दिवाळीच्या बाजारात शेवटच्या क्षणी रंगत आल्याचे दिसले.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने ग्रामीण क्षेत्रासह तालुका मुख्यालयातून येणाऱ्यांची संख्या जास्त असते. दुसरीकडे दोन दिवसांपासून एसटी कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने खाजगी वाहनांची वर्दळ जास्त दिसून आली. परंतु ग्रामीण भागातील एसटीच्या साहयाने साहित्यांची वाहतूक ठप्प झाली होती. याचाही मोठा फटका लघु व्यवसायिकांना बसल्याचे दिसून आला.शहरातील मुख्य मार्गावर कापड, भांडे व ज्वेलर्स यांची दुकाने असल्याने सर्वात जास्त गर्दी दिसून आली. मागील आठवड्यांपर्यत बाजारात चांगलाच शुकशुकाट होता. सोमवारपासून बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून आली. रविवारी बाजाराचा दिवस असल्याने लाखोंची उलाढाल झालीे. मुख्य मार्गाच्या दोन्ही कडेला वाहनांची पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत होता. रांगोळी, पणत्या, कापड दुकान, भांड्यांच्या दुकानात ग्राहकांची सर्वात जास्त गर्दी दिसत होती.शहराच्या मुख्य मार्ग अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा नविन विषय नसला तरी पोलिस प्रशासनाच्या एकेरी वाहतुक नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसले. धनत्रयोदशीला ज्वेलर्स दुकानात गर्दी दिसून येत असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीे व्यवसाय कमी झाल्याचे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चा आहे. नोटाबंदी व जीएसटीचा फटका व अन्य बाबींमुळेही बाजारपेठेत मंदी असल्याचे व्यापारी बोलून दाखवित आहेत. तरीही यात लाखोंची उलाढाल झालेली आहे. वृत्त लिहीपर्यंत सोन्याचांदीचा उलाढालीचा नेमका आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.