शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पालांदुरात फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:46 IST

अतिशय हर्षाेल्हासित वातावरणात पारंपारिकतेच्या आधारावर पालांदूरात बुधवारला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विधीवत लक्ष्मीपूजन पार पडले. नयमरम्य फटाक्यांची आतषबाजी आकाशाकडे लक्ष वेधून घेत होती.

ठळक मुद्देबाजारातही गर्दी : सायंकाळी ६ ते ८ वेळेत लक्ष्मीपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : अतिशय हर्षाेल्हासित वातावरणात पारंपारिकतेच्या आधारावर पालांदूरात बुधवारला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विधीवत लक्ष्मीपूजन पार पडले. नयमरम्य फटाक्यांची आतषबाजी आकाशाकडे लक्ष वेधून घेत होती. बच्चे कंपनी फुलझडी, अनार, चकरी, सापगोळी आदी फटाक्यांच्या नादात करू एकमेकांचे तोंड गोड करीत शुभेच्छांचा वर्षाव झाला. समाजमन प्रफुल्लीतपणे एकमेकांना हस्तादोंलन करीत गोड जेवणाकरीता आग्रह घरीत व्यंजनाची यादी आपआपसात वाचन होते. आदिवासी गोवारी समाजानेही आपली दैवत असलेली ढाल पूजन गावकऱ्यांना डफऱ्यांची व बिरण्याची मजेदार मेजवाणी दिली. सत्तरवर्षाचे म्हातारे नातवासोबत टिपऱ्यांच्या मदतीने लाजवाब नाचत होते. घरोघरी आकाशकंदिल, वीजदिवे, मातीचे दिवे पेटवून प्रकाशाच्या सोबतीने लक्ष्मीपूजन पार पडले. बाजारातही गर्दी फुललेली होती. बुधवारला बारजबंद असूनही केवळ लक्ष्मीपूजना निमित्ताने बाजार सुरू ठेवला होता. कापड, किराणा, मिष्ठान, इलेक्ट्रिक दुकानात सकाळपासूनच गर्दी फुलली होती. जेवनानंतर एकमेकांच्या घरी पान खाण्याची परंपरा मात्र लोप पावली. शिक्षणाकरिता नोकरीनिमित्ताने बाहेर असणारी मंडळी गावाकडे येत आप्तांच्या घरी भेटून एकमेकांना आचार विचाराची देवाण घेवाण करीत होते.उपवर-वधूची चर्चादिवाळीनिमित्ताने पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली आहे. यात एकमेकांकडे असलेली उपवरवधूची चाय पे चर्चा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात जगण्याचा खरी गोडी इथूनच मिळत आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यातील धानाचा हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे. हंगाम आटोपताच वर-वधूची जोडणी सुरू होणार हे निश्चित.गोवारी बांधवांनी ढाल पुजनआदिवासी गोवारी समाज आजही हातावर आणून पानावर खाणारा अधिक आहे. गरीबीत पडलेला समाज दिवाळीनिमित्ताने ढाल पूजन पारंपारिक कला, वाद्य जीवंत ठेवून समाजाचे मनोरंजन करीत आहे.मंडई उत्सवाला उधाणभाऊबीजेपासून झाडीपट्टीत मंडई उत्सवाला आरंभ होत आहे. अर्थात शुक्रवार पासून मंडईचा हंगाम जोर धरणार आहे. शनिवारला पालांदुरची मंडई नियोजित आहे. अफाट गर्दीत मंडई उत्सव बाजार चौकात खुल्या जागेत असून रात्रीला मनोरंजनाकरिता नाटकांचे आयोजनसुद्धा केले आहे. पालांदूरच्या मंडईत विविध प्राण्यांची देखावे, हस्तकला, उंचच्या उंच ढाली, सजलेली दुकाने, पाहुण्यांची रेलचेल हिच ग्रामीण भागाची खरी श्रीमंती मंडईच्या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे.