भंडारा : डॉ.पुुरूषोत्तम दक्षिणकर स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय टेबल टेनिस चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन भंडारा टे टे असोसिएशनच्या वतीने खात रोड येथे करण्यात आले. स्पर्धा मुले, मुली व सिनीयरच्या विविध गटांमध्ये खेळविण्यात आल्या. स्पर्धेत तुमसर, साकोली, जवाहरनगर व भंडारा येथून ७० खेळाडूंनी उत्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ खेळाडू विजय फडके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैज्ञानिक डॉ.ना.ए. दक्षिणकर, डॉ.मनिष बत्रा, पुरुंदरे, मोहीत भडके, प्रणित उरकुडे, रोहित भडके, ध्रुव जौहर, अमोल नखाते, परिमल कोरे आदी उपस्थित होते. मुलींमध्ये श्रेया वझलवार, प्रजापती गायधने, नयन चौधरी, आस्था लांजेवार, आर्या मोरे, अरुंधती शर्मा, विविध गटांमध्ये बक्षिस पात्र ठरले. मोहीष भडके, प्रविण उरकुडे व रोहित भडके यांनी बक्षिस पटकाविले.
जिल्हास्तरीय टेटे चॅम्पियन स्पर्धा
By admin | Updated: July 8, 2015 00:44 IST