शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा आरोग्य अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: May 27, 2016 00:52 IST

पहेला येथील बयान गोपनीय भंग प्रकरण, आष्टी येथील गर्भवती महिलेची नसबंदी प्रकरण, लोकप्रतिनिधी-कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक अशा विविध वादग्रस्त ...

असभ्य वर्तवणुकीचा ठपका: आमदारांनी केली आरोग्य मंत्र्यांकडे तक्रारभंडारा : पहेला येथील बयान गोपनीय भंग प्रकरण, आष्टी येथील गर्भवती महिलेची नसबंदी प्रकरण, लोकप्रतिनिधी-कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक अशा विविध वादग्रस्त प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे अडकले आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीमुळे आरोग्य विभाग चर्चेत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना पाठविले आहे.पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणुकीमुळे रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर असताना आरोग्य यंत्रणेने सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा सुरू आहे. वरिष्ठ अधिकारीच कर्तव्य चोखपणे बजावत नसल्याने आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी येथील गर्भवती महिलेची नसबंदी प्रकरण, पहेला येथील बयान गोपणीय भंग प्रकरण, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणुकीचा विषय सध्या गाजत आहे. ही प्रकरणे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचेच सिद्ध होत आहेत. आरोग्य विभागाच्या समस्या आवासून असल्यातरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्याविषयी काही सोयरसुतक नाही. त्यांच्याविषयी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात यावे, अशी मागणी आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी पत्रातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी दिवसभर व्यस्तआमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी सदर प्रतिनिधीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९७५४९३१०० वर अनेकदा संपर्क साधाला. मात्र 'तुम्ही डायल केलेला क्रमांक सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा' असाच संदेश येत होता.बयाण गोपनीय भंग प्रकरण गुलदस्त्यातभंडारा तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीचा मुहूर्त अद्यापही गुलदस्त्यात आहे. चौकशीला बराच विलंब होत असल्यामुळे 'त्या' अधिकाऱ्यांना बड्या अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याची शक्यता बळावली आहे. चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची उदासिनता संशयाला बळ देत असून याकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.