शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वलथरेसह अनेकांचा राकाँत प्रवेश

By admin | Updated: February 2, 2015 22:59 IST

साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत सोमवारी साकोली

साकोली : साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत सोमवारी साकोली येथील पक्षाच्या मेळाव्यात प्रवेश केला. त्यामुळे ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपुर्वी काँग्रेस पक्षात खिंडार पडली आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रस श्रेष्ठींनी माजी आमदार सेवक वाघाये यांना साकोली विधानसभेची उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. शेवटी काहींनी खुलेआम राष्ट्रवादी काँग्रेसचे कामही केले. या सर्वप्रकरणाची काँग्रेस श्रेष्ठींनी दखल घेतली नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या निवासस्थानी खा. प्रफुल पटेल आले असता जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, पंचायत समिती सदस्य मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, माजी तालुका अध्यक्ष सुरेश कापगते, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. अनिल शेंडे, अर्बन बँकेचे संचालन पप्पु गिऱ्हेपुंजे, लाखनीचे माजी सभापती सुखदेव नागलवाडे, माजी सरपंच उमेश मेश्राम यांच्यासह लाखांदूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.याच महिन्यात साकोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यातही साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्याने शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे व सुरेश कापगते यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)