बारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गतयेत असलेल्या बारव्हा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार ग्रामसभेच्या दिवशी ग्रामस्थांनी चव्हाट्यावर आाणला. यात सरपंच तसेच काही ग्रामपंचायत सदस्यांनी विविध कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत कमेटी बरखास्त करण्याची मागणी एकमुखी ठराव घेऊन ग्रामस्थांनी मंजूर केली. संबंधित ग्रामसभेत घेण्यात आलेले ठराव देण्यात यावे म्हणून किसन सोनवाने यांनी रितसर अर्ज करून मागणी केली. मात्र सदर ग्रामसभेच्या ठरावाची माहिती देण्यास ग्रामसेवक आठवडाभरापासून टाळाटाळ करीत असल्याने सचिवावर कारवाई करण्याची मागणी किसन सोनवाने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केली. अन्यथा उपोषणावर बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित न झाल्याने ही सभा तहकूब करून ९ मे २०१४ रोजी घेण्याचे ठरविले. त्यानुसार ९ मे रोजी तहकुब झालेल्या ग्रामसभेला सकाळी ११ वाजता सरपंचा यशुका झोडे यांच्य अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चांगलीच चर्चा रंगली. यात पाणी पुरवठा योजनेचे कंत्राटदाराला दिलेले देयके, रोजगार हमी अंतर्गत गावात करण्यात आलेले सिमेंट रस्ते बांधकाम, पांदण रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरुम आदी विषय घेऊन ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. गावात नव्याने तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा नळयोजना आठ आठ दिवस बंद राहाते. नळाला एक ते दोन गुंड पाणी मिळत नाही. ऐवढेव ास्तव्य सत्य असताना सुद्धा सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांनी १० लक्ष रुपयाचे धनादेश देऊन कंत्राटदाराला मोकळे केल्याचे बोलले जात आहे. मात्र गावात अजूनही नळयोजनेचे काम अपूर्ण असून कंत्राटदाराला धनादेश दिलेच कसे? असा प्रश्न यावेळी ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित करून सरपंचाला धारेवर धरले. संबंधित कामाचीही उच्चस्तरीय चौकशीची मागणीही करण्यात आली. अशाप्रकारची अनेक कामे आहेत की त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतच्या कामाची चौकशी केल्यास सर्व घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
ंग्रामसभेच्या ठरावाची माहिती देण्यासाठी सचिवाची टाळाटाळ
By admin | Updated: May 22, 2014 23:39 IST