शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅडिट’ करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

By admin | Updated: September 5, 2015 00:45 IST

मोहाडी तालुक्यातील जांभोरा ग्रामपंचायत मधील १३ वित्त आयोग व तंटामुक्त गाव पुरस्कार निधीच्या उसणवार १ लाख १० हजार रक्कमेचे प्रकरण सध्या चर्चेत आहे.

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा ग्रामपंचायत मधील १३ वित्त आयोग व तंटामुक्त गाव पुरस्कार निधीच्या उसणवार १ लाख १० हजार रक्कमेचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. इतरही अनेक फंडातील रक्कमेत गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झालेला असून नवनियुक्त सरपंचांनी सन २०१०-१५ मधील कामकाजाचे 'आॅडीट' करण्याचे ठराव संबंधितांना दिले. परंतु अधिकाऱ्यांकडून प्रकरणी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे.जांभोरा ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभाराचे नाविण्यपुर्ण किस्से सतत उजेडात येत आहेत. ग्रामपंचायत मधील सन २०१०-१५ या कालखंडात झालेले भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असून मासिक व ग्रामसभेत प्रकरणे गाजत आहेत. माजी सरपंच, सचिवाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, मनमर्जीने १३ वित्त आयोग निधीतून ५० हजार रुपयांचा निधी इतर कामांसाठी काढून घेतला व खर्चही केला. तंटामुक्त गाव पुरस्कार निधीतील ६० हजार रुपयांचा निधी सुद्धा इतर कामासाठी वापरला. तत्कालीन सचिवांनी सदर रक्कम आवश्यक कामांसाठी उसणवार घेतल्याचे सांगत आहे. मात्र मासिक सभेत व ग्रामसभेत सदर प्रकरणी सदस्यांचे आक्षेप आहेत. खर्चासंबंधिचे ठराव पारित झालेले नाहीत, असे असतांना निधी उसणवार घेऊ न, खर्च नियमबाहय का करण्यात आला हा प्रश्न अनुत्तरित आहे. उसणवार घेतलेले पैसे वर्ष लोटले असतांना संबंधित खात्यात जमा करण्याचे आलेले नाहीत. त्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत कमेटीला त्या रकमेतून विविध विकास कामांचे नियोजन व अंमलबजावणीही करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामसभामधून त्या संबंधाने अनेकदा नागरिकांची ओरड असते ती वेगळीच. सदर दोन्ही फंडाची रक्कम विशेष प्रयोजनाकरिता शासनामार्फत दिला जातो. त्यातील निधी इतरकामांसाठी वापर करण्यास निर्बंध असतांना तत्कालीन सरपंच व सचिवांनी स्वमर्जीने निर्णय कसा काय घेतला? वर्ष लोटले, सत्ता परिवर्तन झाले मात्र १ लाख १० हजार रुपयांचा निधी उपरोक्त फंडात जमा न झाल्याने दोषींकडून त्वरित रक्कमेची वसुली करुन जमा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)