भंडारा : बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू विषाणुंच्या संक्रमणाने होत असल्याचे दिसते. डास, पाणी, अन्नातूनही प्रसारभारतात होणाऱ्या संक्रामक आजारांमध्ये ९0 टक्के लोकांना अँन्टीबायोटिक्सची गरज नसते. मात्र, गोळ्या घेतल्याशिवाय बरे वाटत नसल्याची मानसिकता निर्माण झाल्याने आपण जबरदस्तीने औषधांचे सेवन करीत राहतो. आजारी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे होणाऱ्या संक्रमणाच्या या क्रियेत अनेकदा सूक्ष्म जीवांचा प्रसार जलदगतीने आणि थेट होतो. कधी-कधी थेट संक्रमण न होता डास, पाणी, अन्न यामाध्यमातूनही प्रसार होतो. याचा वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. जिवाणूंचे संक्रमण झाल्याचे लक्षात येताच डॉक्टारांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. औषधांचा अयोग्य वापरशारीरिक किंवा मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा शारीरिक वेदना घालविण्यासाठी सवर्सामान्यपणे औषधांचा वापर केला जातो. औषधांमुळे जसा रोगांपासून बचाव होतो तसे त्यांच्या अयोग्य वापरामुळे अनेक नवीन आजार उदभवण्याची किंवा मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक औषधेसंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन प्रकारची औषधे वापरतात. लस किंवा प्रतिसिरम यापैकी काही औषधे, खासकरुन पोलिओची लस, अन्य प्रभावी औषधी नसल्यामुळे मौल्यवान मानली जातात. लसींमध्ये विशिष्ट रोग निर्माण करणारे जिवाणू अर्धवट किंवा मृतावस्थेत असतात. लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या लसीमुळे, विशिष्ट रोगाचा सामना करणारी प्रतिपिंडे निर्माण होतात. अशाप्रकारे लस एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यास प्रतिकार करण्यासाठी शरीराला प्रतिक्षम बनवते. पटकी, घटसर्प, यकृत, शोथ (कावीळ), गोवर, देवी या रोगांवर लस आता उपलब्ध असून लसीकरणामुळे देवीच्या रोगाचे निर्मूलन शक्य झाले आहे. मधुमेहासारखे विकारसंक्रमण झालेल्या व्यक्तीची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती, लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असण्याची शक्यता असते. काही औषधीच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती घटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पोषणाची स्थिती, मधुमेहासारखे विकार यांसारखे अनेक घटक रोगनिमिर्तीवर बरेवाईट प्रभाव पाडू शकतात. प्रभावी औषधोपचार घेत आहे अथवा नाही आणि इतरांना संसर्ग टाळावा म्हणून आपल्या परीने किती काळजी घेत आहे यांवरही संसर्गातून पसरणाऱ्या जीवांचे प्रमाण अवलंबून असते.
संक्रमक विषाणूंमुळे वाढताहेत आजार
By admin | Updated: September 18, 2015 00:41 IST