शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्त पॅकेजपासून वंचित

By admin | Updated: August 1, 2016 00:21 IST

जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला.

पॅकेज देण्यास दिरंगाई : गोसीखुर्द पुनर्वसन विभागाचे दुर्लक्ष भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. ज्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन घरदार बहाल केले, गोसेखुर्द प्रकल्पाला आज २५ वर्षे होऊन गेले. परंतु प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुखले नाही. उलट समस्याच वाढत आहे. अशातच खैरी (सालेबर्डी) येथील गावठाण बाहेरील ६० कुटुंबांना अजूनही पुनर्वसन पॅकेज मिळाले नाही. याकडे गोसेखुर्द विभागाचे व जिल्हा प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबे रोज जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन संबंधित विभागात रोज चकारा मारत आहेत. परंतु त्यांना अजूनही पॅकेज मिळाले नसून, संबंधित विभागाविरुद्ध प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे.खैरी (सालेबर्डी) येथील गावठाणाबाहेरील ६० घरे भूसंपादन प्रकरणात संपादित करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत गावठाण बाहेरील ते ६० कुटुंबे अजूनही पॅकेज पासून वंचित आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.खैरी या गावाचे पुनर्वसन अशोकनगर (फुलमोगरा) या नियोजितस्थळी युद्धपातळीवर काम सुरु आहे. काही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास गेली. त्याचप्रमाणे गावठाणाबाहेरील ६० घरांना सुद्धा भूखंड, मोबदला सुद्धा मिळाला आहे. सदर कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसन करण्याच्या तयारीत असतानासुद्धा गोसेखुर्द पुनर्वसन विभाग या ६० कुटुंबांना पॅकेज देण्यास दिरंगाई करीत आहे. तसेच या कुटुंबांनी पुनर्वसन ठिकाणी बांधकामास सुरुवात सुद्धा केलेली व तुटपूंज्या मोबदला देऊन त्यांचे बांधकाम अर्धवट आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना जर प्रशासनाने पॅकेज दिले तर त्यांचे घरांचे बांधकाम पूर्णत्वास येण्यास मदत होईल. सदर कुटुंबाची जुनी घरे मोडकळीस आले आहेत. दरवर्षी घरांची दुरुस्ती करून नाकीनऊ आले आहे. जीव मुठीत घेऊन ही कुटुंबे मोडक्या घरात वास्तव करीत आहे. तरी संबंधित विभाग व प्रशासनाने या ६० कुटुंबांना लवकरात लवकर पॅकेज देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)