शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

थेट मृत्यूलाच आव्हान !

By admin | Updated: June 4, 2014 23:29 IST

कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून

खबरदारी गरजेची : प्रवासात चुकाल तर जीवाला मुकालनंदू परसावार / तथागत मेश्राम - भंडाराकोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दोन दिवस शुद्धीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवावरही बेततो. अनेकदा रेल्वेस्थानकावर उशिरा पोहोचलेले प्रवासी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करून थेट मृत्यूलाच आव्हान देतात. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलिही सावधगिरी बाळगताना दिसत नाहीत. याबाबत जनजागृती करूनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.रेल्वे प्रवासात प्रवाशांसोबत दररोज लुटीच्या अनेक घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी रेल्वेगाड्यात प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेत असतात. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची सर्रास लूट केली जाते.अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोनेचांदीचे दागिने पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. परंतू त्या नियमाकडे डोळेझाक करण्यात येत असल्यामुळे ते प्रवाशांच्या जीवितावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊनच आपला बचाव करण्याची गरज आहे.अवैध व्हेंडरला म्हणा ‘नो’रेल्वेत खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्हेंडर्सची नियुक्त केलेले असते. यासाठी त्यांना रीतसर खाद्यपदार्थ विकण्याचा परवाना व ओळखपत्र रेल्वेकडून देण्यात येते. परंतु अनेकदा रेल्वेत कुठलाही परवाना नसताना अनेक अवैध व्हेंडर्स खाद्यपदार्थ विकताना दिसतात. त्यांच्याकडील चटपटीत खाद्यपदार्थ दिसले की प्रवाशांच्या जीभेला पाणी सुटते. कुठलाही विचार न करता प्रवासी खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. या खाद्य पदार्थात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशाने असे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध होतात. त्याचा फायदा घेऊन त्यांचे महागडे साहित्य, पैसे चोरीला जाण्याच्या घटना घडतात.महागडे दागिने घालून झोप घेणे टाळा प्रवासात बहुतांश महिला महागडे दागिने पर्समध्ये ठेवून बर्थवर बिनधास्तपणे झोपी जातात. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अशा महिलांचे दागिने चोरट्यांकडून लंपास होतात. अलीकडे तर रेल्वे प्रवासात अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासात महागडे दागिने घालून किंवा पर्समध्ये पैसे ठेवून झोपणे म्हणजे चोरीला निमंत्रण देण्यासारखे ठरणारे आहे.