शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

गोडाऊनचे भाडे थकल्याने मजुरांचे वेतन देण्यास अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

रंजित चिंचखेडे चुल्हाड ( सिहोरा ) : दि सहकारी राईस मिल सिहोरा येथील गोडाऊनचे भाडे थकल्याने मजुरांचे वेतन ...

रंजित चिंचखेडे

चुल्हाड ( सिहोरा ) : दि सहकारी राईस मिल सिहोरा येथील गोडाऊनचे भाडे थकल्याने मजुरांचे वेतन देण्यास अडचणी येत आहेत. यामुळे संतापलेल्या अध्यक्ष गंगादास तुरकर यांनी रागाचे भरात बैठकीत पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बैठकीत काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. परंतु या राजीनाम्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. अशी माहिती मिळाली आहे.

सिहोरा येथील दि सहकारी राईस मिलची स्थापना सन १९५९ मध्ये करण्यात आली आहे. सुरुवातीच्या कालावधीत राईस मिलचे कामकाज भरभराटीला होते. परिसरात एकमेव राईस मिल असल्याने धानाची भरडाई अधिक होती. उत्पन्न अधिक असल्याने बहुमजली इमारतीची उभारणी राईस मिल संचालक मंडळाने केली आहे. परंतु नंतर परिसरात अनेक राईस मिल निर्माण झाल्याने धानाचे भरडाईत घट झाली आहे. या संस्थेचे शेजारी तीन गोडाऊन आहेत. धानाचे पोती साठवणूक करण्यासाठी पणन महासंघाला देण्यात आले आहे.

सन २००९ पासून पणन महासंघाकडे ५५ लाख रुपयांची थकबाकी असल्याने प्रशासकीय कारभार करताना संचालक मंडळाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. राईस मिलच्या तिजोरीत पैसा नसल्याने संचालक मंडळ टेन्शनमध्ये आले आहे. दरम्यान राईस मिलची तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी संचालक मंडळाने धानाची भरडाई संस्थेच्या मिलमध्ये करण्याची शक्ती करण्यात आली आहे. परंतु नंतर निर्देशाला बगल देण्यात आली आहे. यानंतर पुन्हा स्थिती जैसे थे झाली असल्याचा अनुभव संचालक मंडळाला आलेला आहे.

तिजोरी रिकामी असताना वीज वितरण कंपनीचे थकीत बिल धडकले, १ लाख रुपयांचे वीजबिलाने थकबाकी ओलांडली असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तब्बल १५ दिवस वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आल्याने संचालक मंडळाच्या चिंता वाढल्या होत्या. ७० हजार रुपयापर्यंत जुळवाजुळव करण्यात आली. नंतर खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. एक टेन्शन समाप्त होत नाही तोच दुसऱ्या समस्याने संचालक मंडळाला ग्रासले. मजुरांचे वेतन थकल्याने संचालक मंडळाच्या कार्यलयात मजूर धडकले. यामुळे संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्याचा रक्तदाब वाढला होता. मजुरांचे तीन लाखांचे वेतन अडले आहे. सांघिकचे पैसे अडल्याने मजूर रोज संचालक मंडळाला हातावर घेत आहेत. पणन महासंघाने गोडाऊनचे भाडे दिले नसल्याने राईस मिलच्या संचालक मंडळाचे अडचणी वाढल्या आहेत. ११ संचालक असणाऱ्या या राईस मिलमधील ३ संचालकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अध्यक्षांवर प्रशासकीय कारभाराचा भार आलेला आहे. संस्थेने राईस मिल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांचेही देयक निधी अभावी अडले आहेत. पणन महासंघाकडे लाखों रुपयांची थकबाकी असताना अनुदान दिले जात नाहीत. यामुळे रागाचे भरात अध्यक्ष पदाचा राजीनामा गंगादास तुरकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत दिला आहे. राजीनामा देताच बैठकीत गोंधळ उडाला आहे. परंतु या राजीनाम्यावर अद्याप चर्चा झाली नाही. अशी माहिती मिळाली आहे.

पणन महासंघाकडे ५५ लाख रुपये गोडाऊनचे भाडे अडले आहे. वेतनसाठी मजूर ओरडत आहेत. प्रशासकीय कारभारासाठी निधी नाही. प्रशासकीय कारभार करताना अडचणी येत आहेत. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

-गंगादास तुरकर अध्यक्ष, दि सहकारी राईस मिल, सिहोरा.