शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

शिक्षकांअभावी ढिवरवाडा शाळा बंद

By admin | Updated: July 14, 2016 00:35 IST

ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत वर्ग एक ते पाच असून येथे शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

ग्रामस्थांचा निर्णय : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करडी (पालोरा) : ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत वर्ग एक ते पाच असून येथे शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. पटसंख्येनुसार वर्ग पहिली ते पाचवीला चार शिक्षकांची गरज आहे. वर्ग सहा ते आठ ला प्रत्येकी एक या प्रमाणे तीन शिक्षकांची गरज आहे. १ जुलै रोजी या शाळेतील एक शिक्षक जांभोरा शाळेत पाठविला. त्यामुळे पदविधर शिक्षकाची जागा रिक्त झाली आहे. शिक्षकांची संख्या कमी असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा शिक्षण समिती व ग्रामस्थांनी आजपासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शाळा समिती अध्यक्ष बी.एन. हिंगे, भोजराज वनवे, सरपंच एस.के. वनवे, उपसरपंच नितीन रामटेके, सहसराम वनवे, कैलाश हिंगे, भारत वनवे यांच्यासह ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर) बपेरा येथे वर्ग चार; शिक्षक एक उसर्रा : तुमसर तालुक्यातील बपेरा (आंबागड) येथे एका शिक्षकावर चार वर्ग सांभाळण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बपेरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ वर्ग आहेत. शाळेत एकुण विद्यार्थीसंख्या ५० इतकी आहे. शाळा सुरु झाली तेव्हापासून एकच शिक्षक पूर्ण शाळा सांभाळत असल्याने चार वर्गाना एक शिक्षक कुठपर्यंत शिकविणार असा प्रश्न पालकांनी केला आहे. या आधी मागीलवर्षी सदर शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामवासीयांनी शिक्षकांच्या मागणीसाठी थेट पंचायत समिती तुमसर येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांसमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावर एक शिक्षक देण्यात आले होते. एक शिक्षक रजेवर असताना संबंधित विभागाने दुसरा शिक्षक येरली शाळेतून दिला होता. त्याही शिक्षकाला संबंधित विभागाने घेऊन गेले. आंबागड शाळेतून शिक्षक दिले होते तेही शिक्षक परत नेले. मानधनावर एक शिक्षक नेमण्यात आला आहे. मात्र तेही बंद करण्यात आले. मानधनावर शिक्षक घेणार नाही असा पवित्रा बपेरावासीयांनी घेतला आहे.(वार्ताहर)